Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी एप्रिल महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 14 To 20 April 2025 : नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 14 To 20 April 2025 : एप्रिल महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या राशीच्या लोकांना प्रेमाशी संबंधित शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या आयुष्यात काही संकटं आली असतील तर ती हळुहळू दूर होतील. आठवड्याचा शेवट मात्र खर्चिक असणार आहे. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला पैशांची किंमत मोजावी लागणार आहे. या कालावधीत एखादी वस्तू दार करणं शुभ ठरेल.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी एप्रिलचा तिसरा आठवडा मध्यम फलदायी असणार आहे. या आठवड्यात तुमच्यासाठी उत्पन्नाचे मार्ग मोकळे होतील. मात्र, तुमची मेहनत करण्याची तयारी ठेवा. तसेच, कुटुंबातील वातावरण प्रसन्न असेल. मुलांना अभ्यासात यश मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येणार आहे.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची पूर्णपणे कालजी घ्यायची आहे. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार पुढे वाढलेला दिसेल. अनेक नवीन गोष्टी तुम्हाला शिकता येतील. नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीसाठी नवीन आठवडा भाग्यशाली असणार आहे. कुटुंबियांबरोबर तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. तसेच, जर तुम्हाला अनेक दिवसांपासून एखादी नवीन वस्तू खरेदी करायची असेल तर त्यासाठी हा आठवडा शुभ असणार आहे. तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीमध्ये तुमचे पैसे गुंतवू शकता. लवकरच तुम्हाला धनलाभ मिळेल.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या आठवड्यात प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. तरच तुम्हाला त्याचं फळ मिळेल. तसेच, प्रेमाच्या बाबतीत तुम्ही फार लकी असाल. जोडीदाराचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. या आठवड्यात भगवान शंकराच्या मंदिराला तुम्ही भेट देऊ शकता.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, आठवड्याच्या सुरुवातीला तुमची आर्थिक परिस्थिती फार चांगली असणार आहे. मात्र, पैशांचा जरा जपून वापर करा. तसेच, कोणत्याही वाईट व्यसनाच्या आहारी जाऊ नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















