Weekly Horoscope 13 To 19 March 2023 : येणारा आठवडा 'या' राशींसाठी खास, तर इतर राशींसाठी अडचणीचा, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 13 To 19 March 2023 : या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहेत. यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात.
Weekly Horoscope 13 To 19 March 2023 : हा आठवडा कर्क, कन्या, तूळ आणि धनु राशीच्या लोकांसाठी नोकरीच्या नवीन संधी घेऊन येईल. सोमवारपासून सुरू होणारा आठवडा ज्योतिषाच्या दृष्टीने खास आहे. या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहेत. यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात. साप्ताहिक पत्रिका
मेष
आठवड्याच्या सुरुवातीलाच काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. ज्या कामाची तुम्ही जबाबदारी घ्याल ते काम तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडू शकाल. कार्यालयात वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही पूर्ण सहकार्य असेल. या आठवड्यात पैसे जपून वापरा. या काळात हंगामी आजारांपासून दूर राहा. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल.
वृषभ
आठवड्याची सुरुवात चांगली असेल. व्यवसायाशी संबंधित कोणतीही शुभ बातमी येईल. आर्थिक बाजू मजबूत राहील. जर तुम्ही बर्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला एखाद्या चांगल्या ठिकाणाहून ऑफर मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तसेच घरामध्ये नोकरदार महिलांचा सन्मान वाढेल. सत्ता-शासनाशी संबंधित प्रलंबित कामे पूर्ण होतील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल.
मिथुन
आठवड्याच्या सुरुवातीला काही अतिरिक्त कामामुळे व्यस्त राहाल. तुमच्यावर कामाच्या जबाबदाऱ्यांचा भार पडेल, त्यामुळे तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो. अशा परिस्थितीत कोणतेही काम हाताळताना संयम राखणे योग्य राहील. आठवड्याच्या मध्यात, आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही परिस्थितीत आपला संयम गमावू नका, नाहीतर चालू असलेले काम बिघडू शकते. ऑफिसमधील अशा लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा जे अनेकदा तुमच्या ध्येयापासून तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. आठवड्याचा मध्य व्यापार्यांसाठी अधिक शुभ आणि लाभ देणारा आहे. या काळात तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल.
कर्क
आठवड्याच्या सुरुवातीला कामात काही अडचणींना सामोरे जावे लागेल. तुम्हाला तुमच्या शरीराची खूप काळजी घ्यावी लागेल. हंगामी आजारामुळे किंवा काही दिर्घ काळापासून असलेल्या आजारामुळे तुम्हाला शारीरिक वेदना होऊ शकतात. वाहन जपून चालवा, इजा होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकाने व्यवसायाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय काळजीपूर्वक घ्यावा. आठवड्याच्या मध्यात आर्थिक स्थिती मध्यम राहील. प्रेमसंबंधात गैरसमज निर्माण होऊ शकतात, ते दूर करण्यासाठी वाद करू नका तर संवादाने प्रश्न सोडवा.
सिंह
आठवड्याची सुरुवात खूप शुभ असणार आहे. जे लोक खूप दिवसांपासून काही मोठ्या प्रकल्पात सहभागी होण्याची वाट पाहत आहेत, त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. एखाद्या प्रभावी व्यक्तीच्या मदतीने दीर्घकाळ रखडलेले काम पूर्ण होईल, त्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवू शकतात. व्यवसायाला पुढे नेण्याचे नियोजन प्रत्यक्षात साकार होताना दिसतील. जर तुम्हाला काही काळ आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल तर त्यात लक्षणीय सुधारणा होईल.
कन्या
आठवड्याची सुरुवात जीवनाशी संबंधित सर्व अडथळे दूर करण्यात जाईल. न्यायालयाशी संबंधित प्रकरणांमध्ये, निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कोणताही मोठा निर्णय घेताना कुटुंबीयांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जर तुम्ही खूप दिवसांपासून नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. कामासोबतच आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. जेवणाची विशेष काळजी घ्या. जर तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्यासमोर तुमचे प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल तर आठवड्याच्या मध्यात तुमच्या भावना व्यक्त करा.
तूळ
आठवड्याचा शेवट संमिश्र असेल. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येमुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. या दरम्यान हंगामी आजारांपासून सावध रहा. यासोबतच या काळात खाण्यापिण्याची खूप काळजी घ्या. तुमच्या समस्यांकडे पाठ फिरवण्याऐवजी तुम्ही त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. प्रेम संबंध चांगले ठेवण्यासाठी घाई टाळा आणि विचारपूर्वक पुढे जा. तुमचा जोडीदार कठीण काळात तुमच्या पाठीशी असेल.
वृश्चिक
आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या विरोधकांशी खूप सावधगिरी बाळगावी लागेल. अशा लोकांशी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे जे वारंवार तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. घाई करण्याऐवजी कोणतेही काम हुशारीने करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. हंगामी किंवा कोणत्याही दिर्घकालीन आजाराच्या उद्रेकामुळे शरीर आणि मन दुखू शकते. या दरम्यान तुमची जीवनशैली योग्य ठेवा आणि खाण्याकडे विशेष लक्ष द्या. कोणत्याही परिस्थितीत आपल्या वरिष्ठ आणि कनिष्ठांशी संबंध बिघडू देऊ नका.
धनु
आठवड्याच्या सुरुवातीला जीवनाशी निगडीत अडचणी सुकर होताना दिसतील. मित्राच्या मदतीने दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होतील. मुलांशी संबंधित कोणतीही चांगली बातमी मिळेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात लांब अंतराचा प्रवास करावा लागेल. नातेसंबंध विस्ताराच्या दृष्टीने प्रवास सुखकर आणि शुभ राहील. या काळात तुम्हाला घराच्या सजावटीसाठी किंवा दुरुस्तीसाठी तुमच्या खिशातून जास्त पैसे खर्च करावे लागतील, ज्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते.
मकर
आठवड्याच्या सुरुवातीला फायदे-तोट्यांचा विचार करावा. घाई किंवा निष्काळजीपणाने काम करणे टाळा, अन्यथा एक छोटीशी चूकही केलेले काम बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी कामाचा अतिरेक होईल. काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मेहनत आवश्यक आहे. या दरम्यान, व्यवसायात इच्छित नफा प्राप्त होईल. जर तुम्ही बराच काळ तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होईल. या काळात उत्पन्नासोबतच खर्चही जास्त होईल.
कुंभ
आठवड्याच्या सुरुवातीला आळस आणि गर्व टाळावे लागेल. कोणतेही काम उद्यापर्यंत पुढे ढकलण्याच्या सवयीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे तुमचे सर्व काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर घर असो वा कामाची जागा, लोकांना एकत्र ठेवा. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आपला व्यवसाय इतरांच्या विश्वासावर सोडणे टाळा. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला अचानक एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. ज्यासाठी त्यांना अतिरिक्त प्रयत्न आणि कठोर परिश्रम करावे लागतील.
मीन
आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही इतरांच्या कामात गुंतण्याऐवजी तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. त्याचप्रमाणे, एक काम अर्धवट सोडून दुसरे सुरू करणे टाळा, अन्यथा तुमचे दोन्ही कार्य अपूर्ण राहू शकतात. तसेच तुमचे काम इतरांवर सोडवण्याऐवजी ते स्वतः करण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या मध्यात तुमचे विरोधक तुमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू शकतात आणि तुमच्या ध्येयापासून तुमचे लक्ष विचलित करू शकतात, त्यामुळे या काळात तुम्ही तुमचे काम अतिशय काळजीपूर्वक करावे. कोणत्याही परिस्थितीत आपला संयम गमावू नका.