एक्स्प्लोर

Weekly Horoscope 12 June to 18 June 2023 : आजपासून सुरु होणारा आठवडा 'या' राशींसाठी असेल भाग्याचा! साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Weekly Horoscope 12 June to 18 June 2023 : या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहेत. यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 12 June to 18 June 2023 : जून महिन्याचा हा आठवडा वृषभ, वृश्चिक राशीसाठी करिअरच्या दृष्टीने चांगला असणार आहे. तर, कर्क, सिंह राशीच्या खर्चात वाढ होणार आहे. हा आठवडा ज्योतिष राशीभविष्याच्या दृष्टीने खास आहे. या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहेत. यासाठी सर्व 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊयात. 

मेष

मेष राशीच्या लोकांनी या आठवड्यात सावध राहण्याची गरज आहे. तुमची सर्व कामे अतिशय काळजीपूर्वक करा. लोकांशी अनावश्यक वाद घालू नका. कोणतेही काम पूर्ण नियोजन करूनच करा. अन्यथा काम बिघडू शकते. आठवड्याच्या मध्यात प्रवासाचे योग येतील. भावंडांच्या पाठिंब्याने तुम्ही मालमत्तेच्या कामात अडकू शकता. नोकरीची स्थिती चांगली राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्ही कुटुंबाकडे लक्ष द्या आणि घरातील लोकांशी प्रेमाने वागा. आरोग्य चांगले राहील परंतु निष्काळजीपणा टाळा.

वृषभ

वृषभ राशीसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आयुष्यात जे संकट सुरु आहे ते लवकरच दूर होईल. वैवाहिक जीवन चांगले जाईल. आठवड्याच्या मध्यात तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता आणि त्यामुळे तुम्हाला शांती मिळेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात प्रवासाला जाता येईल. प्रत्येक कामात तुम्हाला मित्रांकडून मदत मिळेल आणि कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही. स्वतःची आणि आरोग्याची काळजी घ्या. काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायातील पार्टनरवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. आठवड्याच्या मध्यात धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराबरोबर वेळ आनंदात जाईल. व्यवसायात सुधारणा होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात आर्थिक लाभ होईल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. आरोग्य चांगले राहील आणि नोकरीत थोडा तणाव राहील.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला जाईल. या आठवड्यात तुमचा सकारात्मक दृष्टिकोन गरजेचा आहे. तुमची सर्व कामे होतील. वैवाहिक जीवनात वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. चांगल्या उत्पन्नामुळे तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. आठवड्याच्या मध्यात खर्च वाढतील. तब्येत बिघडू शकते.  आठवड्याचे शेवटचे दिवस कौटुंबिक जीवनासाठी चांगले असतील. 

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कठोर परिश्रमाशी संबंधित असणार आहे. करिअर आणि बिझनेसमध्ये खूप मेहनत करावी लागेल. वैवाहिक जीवनाला वेळ द्या. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला तुमच्या बॉसकडून एखादे मोठे काम मिळू शकते, ज्यामुळे तुमचं प्रमोशनही होईल. उत्पन्न चांगले राहील. काही छोटे-मोठे खर्चही होतील. वैवाहिक जीवनासाठी वेळ चांगला आहे पण बोलण्यात गोडवा ठेवणं गरजेचं आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात खर्च वाढतील. व्यवसायात प्रगती होईल.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. आठवड्याच्या मध्यात करिअरमध्ये चांगले यश मिळेल. तुमच्या कामाचं सर्वजण कौतुक करतील. तुमच्या कामात मोठे पद मिळू शकते. कौटुंबिक तणावात सामंजस्य राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत उत्पन्न चांगले राहील आणि तुमच्या गरजांबरोबरच तुमच्या काही महत्त्वाच्या इच्छाही पूर्ण होऊ शकतात. वैवाहिक जीवनातही आनंद राहील. आरोग्याची काळजी घ्या.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र असणार आहे. आठवड्याची सुरुवात चांगली होईल. आठवड्याच्या मध्यात अनेक अडथळे येऊ शकतात. त्यामुळे नातेसंबंधांना जपा. अनावश्यक पैसे खर्च करू नका. आठवड्याच्या मध्यात लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी प्रवासही होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात घर आणि काम या दोन्ही ठिकाणी चांगले संतुलन दिसून येईल. तुम्हाला तुमच्या लाइफ पार्टनरचीही साथ मिळेल आणि ऑफिसमध्ये तुमचे सहकारी तुम्हाला साथ देतील. या आठवड्यात ऑफिसमध्ये जो तुमच्याशी सर्वात प्रेमाने बोलेल त्याच्यापासून सावध राहा.  

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमच्या कुटुंबात काही समस्या निर्माण होऊ शकतात. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तसेच, या आठवड्यात अनावश्यक पैसे खर्च करू नका. वैवाहिक जीवनात गोडवा असेल. आठवड्याच्या मध्यात गुंतवणूक करणे नुकसानकारक ठरू शकते. काही मोठ्या खर्चाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आठवड्याचे शेवटचे दिवस चांगले जातील. एखाद्या सुंदर ठिकाणी सुट्टी घालवण्याची योजना आखू शकता. आरोग्याची काळजी घ्या. पोटाशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात. अशा परिस्थितीत आपल्या आरोग्याची आणि दिनचर्येची खूप काळजी घ्या. 

धनु 

धनु राशीच्या लोकांनी या आठवड्यात सावध राहण्याची गरज आहे. या आठवड्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. तुमच्या व्यवसायात अनेक प्रतिस्पर्धी भेटतील त्यांच्यावर मात करावी लागेल. यासाठी विचारपूर्वक निर्णय घ्या. आठवड्याच्या मध्यात धनलाभ होण्याची शक्यता आहे. बिझनेस चांगला राहील पण बिझनेस पार्टनरशी भांडण होऊ शकते. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्हाला मानसिकदृष्ट्या खचलेले वाटेल. जोडीदाराचा पाठिंबा या दिवसांत महत्त्वाचा ठरेल. आरोग्याची काळजी घ्या.

मकर 

मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आशावादी असू शकतो. या आठवड्यात तुम्ही तुमची राहिलेली कामं पूर्ण करा. उद्योगपतींसाठी हा आठवडा मोठ्या संधी घेऊन येणारा असेल. कुटुंबीयांबरोबर धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येईल. मालमत्तेशी संबंधित काही वाद असेल तर तो न्यायालयात नेण्याऐवजी वाटाघाटीने सोडवणे योग्य ठरेल. व्यावसायिकाने गोंधळात व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घेणे टाळावे लागेल, अन्यथा तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. सुखी वैवाहिक जीवनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामाच्या किंवा व्यवसायाशी संबंधित बिझी शेड्युलमधून कुटुंबासाठी वेळ काढावा लागेल. आजारांपासून सावध राहा.

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा काहीसा संमिश्र असणार आहे. तुम्हाला या आठवड्यात काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या राशीच्या लोकांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आपलं काम हुशारीने करा. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आठवड्याच्या शेवटी करिअरमध्ये मोठं यश मिळेल. तुमच्याकडून कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा वाढतील. कुटुंबात सुसंवाद राहील. जर तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर लग्न करण्याचा विचार करत असाल तर त्यात येणारे सर्व अडथळे दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

मीन 

मीन राशीच्या लोकांनी या आठवड्यात निष्काळजीपणा टाळणं गरजेचं आहे. या आठवड्यात तुमची मानसिक स्थिती काहीशी ठिक नसणार. त्यामुळे विश्रांतीसाठी वेळ द्या. वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या. आठवड्याच्या मध्यात तुमचा बराचसा वेळ धार्मिक आणि सामाजिक कार्यात जाईल. समाजात तुमचा सन्मान वाढेल. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 12 June 2023 : मेष, कन्या, मकर राशीसाठी दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie ReportBharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
Pandharpur Crime : चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde: मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
Hasan Mushrif : 'हसन मुश्रीफ कोल्हापूर महापालिकेची जबाबदारी आपण घ्या, इथून जबाबदारी घेऊनच जायचं आहे' वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना कोणी दिला सल्ला?
'हसन मुश्रीफ कोल्हापूर महापालिकेची जबाबदारी आपण घ्या, इथून जबाबदारी घेऊनच जायचं आहे' वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना कोणी दिला सल्ला?
Embed widget