एक्स्प्लोर

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; नशीब सोन्यासारखं उजळणार, होणार अपार धनलाभ

Weekly Lucky Zodiacs 07 To 13 October 2024 : ऑक्टोबरचा दुसरा आठवडा 5 राशींसाठी खूप भाग्याचा ठरणार आहे. या 5 राशींचं आयुष्य सुखसोयींनी भरलेलं असेल आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.

Weekly Horoscope 07 To 13 October Lucky Zodiacs : ऑक्टोबरचा दुसरा आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. खरं तर, 7 ऑक्टोबरपासून महिन्याचा नवीन आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात लक्ष्मी नारायण राजयोगासह (Laxmi Narayan Rajyog) अनेक शुभ योग तयार होत आहेत, हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

ऑक्टोबरचा दुसरा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी लकी म्हणता येईल. खरं तर, या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअर किंवा व्यवसायाच्या संदर्भात लहान किंवा लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागू शकतो. नोकरदार लोकांसाठी आठवडा भाग्याचा म्हणता येईल. वास्तविक, या राशीचे लोक जे प्रमोशन वगैरेची वाट पाहत आहेत, त्यांची इच्छा यावेळी पूर्ण होऊ शकते. राजकारणाशी संबंधित लोकांना काही मोठी जबाबदारी किंवा पद मिळू शकतं. जर तुम्ही जमीन किंवा इमारत खरेदी-विक्रीचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. लव्ह लाईफसाठी हा आठवडा खूप अनुकूल असणार आहे. तुमचं आरोग्यही ठणठणीत असेल.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा दुसरा आठवडाही खूप अनुकूल असणार आहे. या आठवड्यात तुमचं नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल. या काळात तुमच्या प्रगतीत जे अडथळे येत होते ते आता दूर होतील. नोकरीत जे लोक तुम्हाला अनेक दिवसांपासून त्रास देत होते ते आता शांत होणार आहेत. म्हणजे तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत. नोकरीच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढेल. तसेच विद्यार्थ्यांसाठीही वेळ चांगली आहे. तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. पण, कोणतंही काम करताना घाई होणार नाही याची विशेष काळजी घ्या. अन्यथा तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. या आठवड्यात वाहन सावधगिरीने चालवा.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना यावेळी नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या आठवड्यात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचं सुख मिळेल. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आठवडा तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला एकामागून एक उत्तम लाभाच्या संधी मिळतील. राजकारणाशी निगडीत लोकांसाठी आठवडा खूप शुभ राहील. आठवड्याच्या सुरुवातीला काही मोठी जबाबदारी किंवा पद मिळू शकतं. या आठवड्यात तुमच्या काही अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. 

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा दुसरा आठवडा चांगला राहील. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला करिअर आणि बिझनेसमध्ये तुम्हाला मोठं यश मिळू शकतं. या राशीच्या नोकरदार महिलांना काही मोठं यश मिळू शकतं. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणारे विद्यार्थी आणि परदेशात आपले करिअर घडवण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांना काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आठवड्याच्या शेवटी अधिक सावध राहावं लागेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत आठवडा खूप चांगला जाणार आहे. प्रियकरासोबत तुमचे संबंध चांगले राहतील. विवाहित लोकांसाठीही आठवडा चांगला असणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले असतील.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

ऑक्टोबरचा दुसरा आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही बातम्या मिळतील, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. हा आठवडा तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ देईल. तुम्ही खूप दिवसांपासून करत असलेली मेहनत आणि ज्याचं फळ तुम्हाला मिळत नव्हतं, ते आता तुम्हाला मिळेल. विवाहितांना सासरच्या लोकांकडून विशेष सहकार्य मिळेल. तुम्ही इतर लोकांकडे आकर्षित होऊ शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
Chhagan Bhujbal: शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळ म्हणाले, 'पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ!'
शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळांच्या गूढ वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Manoj Jarange Patil : इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 06 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स-Navi Mumbai First Mango Price : वाशिमच्या APMC मध्ये केसर आंब्याची पहिली पेटी दाखल, भाव किती?All Party Leader Meet Governer Mumbai : सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट,काय मागणी केली?Dr Ravi Godse On HMPV virus : एचएममपीव्हीची व्हायरस नेमका काय आहे? डॉ. रवी गोडसेंनी सविस्तर सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
Chhagan Bhujbal: शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळ म्हणाले, 'पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ!'
शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळांच्या गूढ वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Manoj Jarange Patil : इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
Sucess Story: आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
Embed widget