Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : नवीन आठवडा सुरू होणार आहे. ऑक्टोबरचा दुसरा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. ऑक्टोबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील. या आठवड्यात तुमचा मान-सन्मान वाढेल. आपल्या खाण्याच्या सवयी आणि दैनंदिन दिनचर्या योग्य ठेवा. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट मिळू शकतं.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात अपेक्षित परिणाम मिळतील. करिअर आणि बिझनेसमध्ये तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार महिलांसाठी हा आठवडा खूप शुभ ठरणार आहे. तुम्ही बढती किंवा बदलीची योजना आखत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होईल. भागीदारी व्यवसायात तुम्हाला लाभ मिळेल.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
नवीन आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी नवीन संधी घेऊन येईल. या आठवड्यात प्रत्येक कामाबाबतचं तुमचं नियोजन पूर्ण होईल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला मोठी डील मिळू शकते. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. या आठवड्यात तुमचा खर्च वाढेल.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्साहाने भरलेला असेल. तुमच्या मित्राला मदतीने तुमचं काम पूर्ण होईल. अपेक्षित यश मिळवण्यासाठी आळस सोडून कठोर परिश्रम करावे लागतील. मोठ्या डील करताना काळजी घ्या. पैशापेक्षा खर्च जास्त असू शकतो.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
नवीन आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. तुम्ही तुमचे मित्र आणि प्रियजनांसोबत आनंदाने वेळ घालवाल. कामामुळे तुम्ही थकलेले राहाल. या आठवड्यात तुम्हाला प्रत्येक कामात विशेष लाभ मिळेल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
नवीन आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी शुभदायी ठरेल. कोणतेही काम पूर्ण झाल्यानंतर मनामध्ये आनंद राहील. विवाहितांना सासरच्या लोकांकडून विशेष सहकार्य मिळेल. तुम्ही इतर लोकांकडे आकर्षित होऊ शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Saturday Remedies : फक्त एका शनिवारी करा 'हा' उपाय; सोन्यासारखं उजळेल नशीब, शनि दोष होईल दूर