Weekly Horoscope 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 04 To 10 November 2024 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 04 To 10 November 2024 : नोव्हेंबरचा नवीन आठवडा सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक आहे. हा आठवडा फार खास असणार आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. नुकतीच दिवाळी संपली आहे. त्यामुळे दिवाळीनंतरचा हा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुमचं मन अशांत असेल. तसेच, या आठवड्यात तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, तुम्हाला धन-संपत्ती कमावण्याची चांगली संधी मिळेल. कोणत्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी आठवड्याचा शेवटचा काळ चांगला असणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. तसेच, तुमची लव्ह लाईफ चांगली असेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा पहिला आठवडा महत्त्वाचा असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या वाणीवर लक्ष केंद्रित करावं लागेल. तसेच, कुटुंबियांची साथ तुम्हाला मिळेल. या आठवड्यात कोणत्याही व्यक्तीला तुमच्या भावनांशी खेळू देऊ नका. तसेच, व्यक्तीला ओळखायला शिका. अन्यथा कोणीही तुमच्या भावना दुखवू शकता. तसेच, आठवड्याच्या शेवटी तुम्ही धार्मिक यात्रेला जाण्याचा योग आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीसाठी नवीन आठवडा चांगला आणि उत्साहाचा असणार आहे. या आठवड्यात तुमचं मन प्रसन्न असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही बदल करण्याची गरज आहे. तसेच, तुम्ही तुमच्या करिअरमध्ये बदल करण्याची गरज आहे. तुम्हाला जर नवीन प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. मित्रांचा सहवास चांगला लाभेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या काळात थोड्याफार प्रमाणात तुमच्या आत्मविश्वासात कमतरता दिसेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत जास्त सतर्क असण्याची गरज आहे. पैशांच्या बाबतीत तुमची अनेकजण मदत मागू शकतात. तसेच, या आठवड्यात तुम्ही तुमच्या फिटनेसवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा चांगला तसेच आशावादी असणार आहे. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. शैक्षणिक क्षेत्रात तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, प्रवासाला जाण्याचे अनेक योग आहेत. या आठवड्यात तुमच्या मनातील संपूर्ण नकारात्मकता दूर होईल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा प्रसन्नतेचा असणार आहे. नवीन कार्य करण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक असाल. तसेच, जर तुम्हाला नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्यासाटी हा काळ चांगला असणार आहे. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. कामात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगला सपोर्ट तुम्हाला मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :