एक्स्प्लोर

Weekly Horoscope 03 July to 09 July 2023 : हा आठवडा 'या' राशींसाठी चांगल्या संधी घेऊन येणार! साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Weekly Horoscope 03 July to 09 July 2023 : या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहेत. यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 03 July to 09 July 2023 : हा आठवडा कर्क, तूळ, कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगली संधी घेऊन येईल. सोमवारपासून सुरू होणारा आठवडा ज्योतिषाच्या दृष्टीने विशेष आहे. या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहेत. यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात. 

मेष 

मेष राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कार्यालयात वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही पूर्ण सहकार्य असेल. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित प्रवास शुभ आणि फायदेशीर ठरतील. या आठवड्यात तुम्हाला धनप्राप्ती होईल, पण खर्चाचा अतिरेकही राहील. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याने बजेट थोडे विस्कळीत होऊ शकते. आठवड्याच्या मध्यात आरोग्याची नीट काळजी घ्या. या काळात हंगामी आजारांपासून दूर राहा. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांबरोबर आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल. 

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांची आठवड्याची सुरुवात सामान्य राहील. व्यावसायिकांचे मार्केटमध्ये अडकलेले पैसे अनपेक्षितपणे त्यांना मिळतील. तुम्ही पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदाही तुम्हाला मिळेल. या आठवड्यात आपल्या व्यवसायात किंवा कोणत्याही योजनेत पैसे गुंतवताना अत्यंत सावधगिरी बाळगा आणि तज्ञांचा सल्ला घ्या. मालमत्तेशी संबंधित वादात निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्ती प्राप्त होईल. आठवड्याच्या मध्यात परदेशी व्यावसायिकांच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. या दरम्यान समाजाशी संबंधित कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांची आठवड्याची सुरुवात थोडी व्यस्त असणार आहे. तुमच्यावर कामाच्या जबाबदाऱ्यांचा भार पडेल. यामुळे तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो. अशा परिस्थितीत कोणतेही काम पूर्ण करताना संयम राखणे योग्य राहील. तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. अन्यथा तुमचे काम बिघडू शकते. आठवड्याचा मध्य हा व्यावसायिकांसाठी अधिक शुभ आणि लाभ देणारा आहे. या काळात तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक बाबींमध्ये हळूहळू प्रगती होईल. तुमचे आरोग्य सामान्य राहील. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. 

कर्क

कर्क राशीच्या लोकांना या आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबाशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्यात अडथळे येऊ शकतात. कामात अचानक अडथळा आल्याने मन अस्वस्थ राहील. अशा वेळी संभ्रमावस्थेत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. नोकरीसाठी फिरणाऱ्या लोकांना आणखी वाट बघावी लागू शकते. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. या काळात तुम्हाला हंगामी आणि दिर्घकालीन आजारामुळे त्रास होऊ शकतो. नोकरदार वर्गाला मात्र हा काळ काहीसा दिलासा देणारा आहे. ऑफिसमध्ये सुरू असलेल्या अडचणी कमी होतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रेम संबंध चांगले ठेवण्यासाठी जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांची आठवड्याची सुरुवात खूप शुभ असणार आहे. जे लोक खूप दिवसांपासून एखाद्या मोठ्या प्रकल्पात सहभागी होण्याची वाट पाहत होते, त्यांची इच्छा पूर्ण होईल. एखाद्या प्रभावी व्यक्तीच्या मदतीने तुमचे दीर्घकाळापासून रखडलेले काम पूर्ण होईल, त्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवू शकतात. व्यवसायाला पुढे नेण्याची योजना प्रत्यक्षात अमलात आणाल. तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा होईल. जर तुम्ही खूप दिवसांपासून वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. आठवड्याच्या शेवटी कोणत्याही धार्मिक सहलीचे नियोजन होईल.  

कन्या

कन्या राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला जीवनात मोठे सकारात्मक बदल दिसून येतील. बऱ्याच काळापासून इच्छित ठिकाणी बदलीची तुमची इच्छा पूर्ण होईल. नोकरदार व्यक्तीला अनपेक्षितपणे काही जबाबदारी मिळू शकते. आठवड्याच्या मध्यात करिअर व्यवसायाशी संबंधित प्रवास खूप शुभ असेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी  उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. या आठवड्यात आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्या आणि दिनचर्या योग्य ठेवा. 

तूळ

तूळ राशीच्या लोकांची आठवड्याची सुरुवात संमिश्र असणार आहे. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येमुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. या दरम्यान हंगामी आजारांपासून सावध रहा. याबरोबरच या दरम्यान खाण्यापिण्याची खूप काळजी घ्या. व्यावसायिकांना आपल्या प्रतिस्पर्ध्यांकडून आव्हानांना सामोरे जावे लागेल. नोकरी करणार्‍या व्यक्तीला त्यांच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांशी उत्तम समन्वय राखण्याची आवश्यकता असेल. प्रेम संबंध चांगले ठेवण्यासाठी घाई टाळा आणि विचारपूर्वक पुढे जा. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांची या आठवड्याची सुरुवात संमिश्र जाईल. या आठवड्यात तुम्हाला तुमचे पैसे अतिशय विचारपूर्वक खर्च करावे लागतील. सप्ताहाच्या मध्यात तुम्हाला कोर्ट-कचेरी किंवा सत्ता-सरकारशी संबंधित कोणत्याही प्रकरणाबाबत अधिक धावपळ करावी लागू शकते. ऑफिसमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे फायदेशीर ठरेल. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या क्षमतेनुसार तो वाढवण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराबरोबर आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. 

धनु

धनु राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला जीवनाशी संबंधित अडचणींना सामोरं जावं लागू शकते. एखाद्या जिवलग मित्राच्या मदतीने दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. आठवड्याच्या मध्यात करिअर व्यवसाय किंवा वैयक्तिक कामाशी संबंधित प्रवास करावा लागेल. या काळात तुम्हाला घराच्या सजावटीसाठी किंवा दुरुस्तीसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील, ज्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. जे अजूनही अविवाहित आहेत, त्यांना लवकरच शुभवार्ता मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. 

मकर 

मकर राशीच्या लोकांची आठवड्याची सुरुवात अनुकूल राहील. दीर्घकाळ नोकरीसाठी भटकणाऱ्या तरूणांना लवकरच चांगला रोजगार मिळेल. करिअर व्यवसायाशी संबंधित अडचणी मित्राच्या मदतीने दूर होतील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. वरिष्ठांचे आशीर्वाद आणि कनिष्ठांचे सहकार्य लाभेल. भूतकाळातील कोणत्याही योजनेत गुंतवणुकीचा लाभ मिळू शकतो. मालमत्तेशी संबंधित वादात निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. धार्मिक यात्रेला जाण्याचा योगायोगही घडू शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील. 

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला आळस आणि गर्वाला टाळावे लागेल. उद्यापर्यंत कोणतेही काम पुढे ढकलण्याच्या सवयीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे तुमचे सर्व काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला अचानक एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. ज्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न आणि कठोर परिश्रम करावे लागतील. विद्यार्थ्यांना आठवड्याच्या शेवटी काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमचे आरोग्य आणि नातेसंबंध या दोन्हींची चांगली काळजी घ्या. या दरम्यान, आपल्या घरातील वरिष्ठ सदस्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रेमसंबंधात निर्माण झालेले गैरसमज वादाऐवजी संवादाने दूर करा. वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी जोडीदारासाठी वेळ काढा. 

मीन 

मीन राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत आणि धावपळ करावी लागेल. एकंदरीत, तुम्हाला अपेक्षित यश मिळणार नाही किंवा तुमचा वेळ आणि उर्जा दोन्ही योग्य प्रकारे व्यवस्थापित होणार नाही. पदोन्नती आणि बदलीची संबंधित तुमची प्रतीक्षा संपेल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मोठी ऑफर मिळू शकते. नोकरदार व्यक्तीसाठी आठवड्याचे शेवटचे दिवस उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत बनतील. मात्र, उत्पन्नासह खर्चाचा अतिरेक होईल. मालमत्ता खरेदी-विक्रीत घाई टाळा. कुटुंबीयांबरोबर आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Monthly Horoscope July 2023 : जुलै महिना 'या' राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक! 5 महत्त्वाच्या ग्रहांचे परिवर्तन, मासिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हा काय होतं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राजकारण, महायुतीला किती जागा?
जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हा काय होतं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राजकारण, महायुतीला किती जागा?
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambit Patra on Gautam Adani : छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या काळात अदानींची गुंतवणूक कशीKolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेपRahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधीHemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हा काय होतं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राजकारण, महायुतीला किती जागा?
जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हा काय होतं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राजकारण, महायुतीला किती जागा?
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Embed widget