Vastu Tips : घरात चांदीच्या वस्तूची योग्य दिशा कोणती? आयुष्यात पैसा, समृद्धी आणि चांगल्या संधी हव्या असतील तर 'या' चुका टाळा
Vastu Tips For Silver Utensils : ज्योतिषशास्त्रानुसार, चांदीचा रंग पांढरा आहे. आणि पांढरा रंग हा चंद्राचं प्रतीक मानला जातो.
![Vastu Tips : घरात चांदीच्या वस्तूची योग्य दिशा कोणती? आयुष्यात पैसा, समृद्धी आणि चांगल्या संधी हव्या असतील तर 'या' चुका टाळा Vastu Tips What is the right direction of silver utensils in the house avoid these mistakes for money and prosperity Vastu Tips : घरात चांदीच्या वस्तूची योग्य दिशा कोणती? आयुष्यात पैसा, समृद्धी आणि चांगल्या संधी हव्या असतील तर 'या' चुका टाळा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/1778aa46d8489d01813a1f930abe7d1b1717053383561358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vastu Tips For Silver Utensils : घरातील प्रत्येक वस्तू कोणत्या दिशेला असावी याचा वास्तूशास्त्रात (Vastu Shastra) उल्लेख आढळतो. त्याचप्रमाणे घरात चांदीची वस्तू असेल तर ती वस्तू योग्य ठिकाणी ठेवणं उत्तम मानलं जातं. वस्तू योग्य दिशेला ठेवली तर त्यातून चांगला लाभ मिळतो. अन्यथा ती वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने ती सदोष होऊन त्याचे अशुभ परिणाम मिळतात असं वास्तू शास्त्रात म्हटलंय. अशा परिस्थितीत घरात चांदीच्या वस्तू किंवा चांदीचे दागिने हे नेमके कुठे ठेवावेत. याबाबत वास्तूशास्त्र काय म्हटलंय हे जाणून घेऊयात.
ज्योतिषशास्त्रानुसार, चांदीचा रंग पांढरा आहे. आणि पांढरा रंग हा चंद्राचं प्रतीक मानला जातो. म्हणून, चांदीचा शासक ग्रह चंद्र आहे असं म्हणतात. त्यामुळे घरात चांदी ठेवण्यासाठी योग्य स्थान चंद्राची दिशा मानली जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र पश्चिमेला उगवतो आणि पूर्वेला मावळतो. कोणत्याही ग्रहाशी कोणत्याही धातूचा संबंध असला तरी त्या धातूला ग्रहाच्या उदयाच्या ठिकाणी ठेवणं शुभदायक मानलं जातं. अशा वेळी घरात चांदीच्या वस्तू असतील किंवा दागिने असतील तर त्या घराच्या पश्चिम दिशेलाच ठेवाव्यात असं वास्तूशास्त्रात म्हटलंय.
चांदीच्या वस्तू योग्य दिशेला ठेवण्याचे फायदे...
- चांदीच्या वस्तू नेहमी लाल कपड्यात गुंडाळून ठेवाव्यात. यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. तसेच, कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत होते.
- तसेच चांदीच्या वस्तू लाल कपड्यात गुंडाळून घराच्या पश्चिम दिशेला ठेवल्या तर चंद्रामुळे आपल्या जीवनात शुभ परिणाम दिसू लागतात.
- वास्तू शास्त्रानुसार आपण आपल्या घरात भांडी किंवा सजावटीच्या वस्तूंमध्ये चांदी ठेवू शकतो. यामुळे घरातील वाद कमी होण्यास मदत होते.
- चांदीच्या सजावटीच्या वस्तू घरात ठेवल्याने धन-संपत्तीतही वाढ होण्यास मदत होते.
- तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, चांदीच्या भांड्यात अन्न खाल्ल्याने खोकल्याशी संबंधित समस्यांवर नियंत्रण मिळवता येतं. कारण हे शरीर थंड ठेवण्यास आणि मनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.
- घरातील वास्तूदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तर घरात चांदीचा खिळा नक्की ठेवावा.
- व्यावसायिकांनी देखील चांदीची वस्तू योग्य दिशेला ठेवल्यास व्यवसायात तुमची प्रगती होऊ शकते असं म्हणतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
June Month Numerology Horoscope : 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी जून महिना ठरणार वरदान; दररोज मिळणार चांगली बातमी, धन-संपत्तीतही होईल वाढ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)