Vastu Tips : बंद घड्याळ, फोटोफ्रेम आणि उघडं दार तर सगळ्यांनाच माहितीय; पण तुमच्या 'या' 10 चुकांमुळेही भासते अर्थिक चणचण
Vastu Tips : घरात वास्तुशी संबंधित काही चुका करत असाल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
![Vastu Tips : बंद घड्याळ, फोटोफ्रेम आणि उघडं दार तर सगळ्यांनाच माहितीय; पण तुमच्या 'या' 10 चुकांमुळेही भासते अर्थिक चणचण Vastu Tips these 10 mistakes can be lack of money follow these vastu shastra remedies marathi news Vastu Tips : बंद घड्याळ, फोटोफ्रेम आणि उघडं दार तर सगळ्यांनाच माहितीय; पण तुमच्या 'या' 10 चुकांमुळेही भासते अर्थिक चणचण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/03/72581befff3bcfc93eba075fc2ca02c61712125465408358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vastu Tips : आपल्या घरात वावर करत असताना, वस्तू ठेवत असताना अनेकदा अशा काही गोष्टी घडत असतात ज्या खरंतर आपल्यालाही कळत नसतात. वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shashtra), जर तुम्ही घरात वास्तुशी संबंधित काही चुका करत असाल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही कर्जबाजारी होऊ शकता किंवा घरात दारिद्रय येऊ शकतं. याकरता घरासाठी कोणत्या गोष्टी अनुकूल नाहीत त्या आत्ताच जाणून घ्या.
1. घराच्या मुख्य दारी अंधार असणं
जर तुमच्या घराच्या मुख्य दारी अंधार असेल तर हे फार अशुभ आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर यामागचं कारण जाणून घ्या की, जर तुमच्या घराच्या मुख्य दारी अंधार असेल तर तुमची जी कामे होणार असतील तीही बिघडतील. याच कारणामुळे भरपूर मेहनत करूनही तुम्हाला कामात यश मिळत नाही.
2. रिकामी बादली घरात ठेवू नका
घरातील बाथरूममध्ये जर रिकामी बादली असेल तरीही तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते.
3. घरातील वस्तू जागच्या जागी ठेवा
जर तुम्ही तुमचे कपडे, चप्पल-बूटं इत्यादी वस्तू इकडे-तिकडे फेकून देतो. तुमच्या या सवयीमुळे लक्ष्मी देवी नाराज होते. आणि यामुळेच तुमच्या घरात पैसाही टिकत नाही.
4. दारं-खिडक्या उघडी ठेवू नका
घरात कधीही दारं-खिडक्या पूर्णपणे उघडी ठेवू नका.असे केल्याने बाहेरची नकारात्मक ऊर्जा घरात येते.
5. पाणी वाया जाऊ देऊ नका
काही लोकांना पाण्याचा नळ सुरु करून मध्येच सोडून जाण्याची सवय असते. वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ असतं. यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
6. रात्रीच्या वेळी परफ्युम वापरू नका
वास्तुशास्त्रानुसार, रात्रीच्या वेळी परफ्युमचा वापर करू नये. कारण याच्या
वासाने घरात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते.
7. दरवाजासमोर स्वयंपाकघर नको
वास्तुशास्त्रानुसार, घरातील दरवाजासमोर स्वयंपाकघर असणं अशुभ मानलं जातं.
8. 'या' ठिकाणी डस्टबीन ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या परिसरात कुठेही कचऱ्याचा डब्बा ठेवू नये. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते.
9. संध्याकाळी 'या' पदार्थांचं सेवन करू नये
जर तुम्ही आर्थिक तंगीचा सामना करत असाल तर संध्याकाळी दूध, दही आणि मीठ कोणालाही खायला देऊ नका. यामुळे तुमच्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
10. रात्रीची खरकटी भांडी सकाळी घासू नका
अनेकांना रात्री जेवणानंतर खरकटी भांडी सकाळी घासण्याची सवय असते. तुम्हाला सुद्धा ही सवय असेल तर वेळीच ही सवय सोडा. कारण यामुळे लक्ष्मी देवी तसेच अन्नपूर्णा तुमच्यावर नाराज होते. ज्यामुळे पैशांची कमतरता भासते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :
Gudi Padwa 2024: "चैत्र पालवी सजू दे, गुढी यशाची मिरवू दे', पाडव्याच्या आधी करा फक्त तीन बदल, घराचे होईल गोकुळ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)