Vastu Tips: दुसऱ्यांच्या घरातून 'या' 3 वस्तू स्वत:च्या घरी चुकूनही आणू नका, अन्यथा होईल सत्यानाश, वास्तुशास्त्रात म्हटलंय...
Vastu Tips: अनेकवेळा माणसाला काही गोष्टींची जाणीव नसते, त्यामुळे अनावधानाने किंवा नकळत एखादी चूक होते आणि ती नुकसानीचे कारण बनते.
Vastu Tips: अतिथी देवो भव:.. भारतीय समाजात पाहुण्यांना देवासमान मानले जाते. आपल्या घरी कोणी आलं की आपण त्याचा असा पाहुणचार करतो की तो व्यक्ती आपल्या घराला आशीर्वाद देऊन गेला पाहिजे. यानिमित्त आपण अनेक गोष्टींची देवाणघेवाण करतो. पण कधी कधी अशा गोष्टी जाणूनबुजून किंवा नकळत आपल्या समोर येतात, ज्यामुळे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे काही अशा वस्तू आहेत. ज्या कधीही कोणाच्याही घरातून आणू नयेत. ज्योतिषशास्त्र आणि शास्त्रातील गोष्टींना जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. अनेकवेळा माणसाला याची जाणीव नसते, त्यामुळे अनावधानाने किंवा नकळत एखादी चूक होते आणि ती नुकसानीचे कारण बनते.
काही गोष्टी कधीही कोणाच्या घरून आणू नयेत
आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा ओळखीच्या व्यक्तींसोबत अनेक गोष्टींची देवाणघेवाण करत असतो. पण काही गोष्टी अशा असतात, ज्या कधीही कोणाच्या घरून आणू नयेत. कारण इतरांच्या घरी आणलेल्या या गोष्टी तुम्हाला अडचणीत आणू शकतात. वास्तुशास्त्रानुसार, एखादी व्यक्ती ज्या वस्तू वापरते, त्याचा प्रभाव त्याच्या ऊर्जेवर पडतो. एखाद्या वस्तूची मालकी बदलल्याने तिची ऊर्जाही बदलते. त्यामुळे कोणाच्याही घरातून अशा वस्तू आणू नका, ज्यावर नकारात्मक ऊर्जेचा जास्त प्रभाव असेल.
फर्निचर - फर्निचरसोबतच नकारात्मक ऊर्जाही घरात येते आणि त्यामुळे वास्तू दोष निर्माण होतात. जुने फर्निचर घरी आणून तुम्ही गरिबीला आमंत्रण देता आणि यामुळे सुखी कुटुंब उध्वस्त होऊ शकते.
चप्पल - अनेक वेळा आपण कोणाच्या घरी जातो, तेव्हा आपण इतरांची चप्पल घालतो, पण असे करू नये. ज्योतिषी अनिश व्यास स्पष्ट करतात की शरीरातून नकारात्मक ऊर्जा जिथून बाहेर पडते ते पहिले स्थान पाय आहे. जेव्हा तुम्ही इतरांचे शूज आणि चप्पल घालता तेव्हा तुमच्यातही नकारात्मकता शिरते आणि तुम्हाला त्रास देते.
छत्री - दुसऱ्याच्या घरून छत्री आणणे देखील शुभ नाही. असे केल्याने ग्रहांची स्थिती बिघडते. काही कारणास्तव दुसऱ्याच्या घरून छत्री आणावी लागली तरी ती घरात आणू नका आणि वापरल्यानंतर परत करा.
हेही वाचा>>>
Hindu Religion: मासिक पाळीच्या वेळी केस धुण्यास नकार का दिला जातो? यामागचे कारण काय? शास्त्रात काय म्हटलंय?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )