(Source: ECI/ABP News/ABP Majha)
vastu tips : नोकरीत यश आणि आर्थिक सुबत्तेसाठी घरामध्ये लावा 'हे' रोप
vastu tips : वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये नागिनीचे रोप लावावे. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. नोकरीत यश मिळेल.
vastu tips : वास्तुशास्त्रात अशा अनेक वनस्पती सांगण्यात आल्या आहेत, ज्या घरामध्ये किंवा कार्यालयात लावल्यास आनंद आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. मानसिक ताण कमी होतो. धन-वैभव, सुख-समृद्धी आणि शांती येते. कुटुंबात शांतता नांदते.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये नागिनीचे रोप लावावे. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. नोकरीत यश मिळेल.
नागिनीचा प्लांट ही हवा शुद्ध करणारी वनस्पती आहे. ही वनस्पती भरपूर ऑक्सिजन बाहेर टाकते आणि कार्बन डायऑक्साइड वायू शोषून घेते.
वास्तुशास्त्रानुसार घरातील नागिनीच्या प्लांटमुळे तणाव कमी होतो. यामुळे मानसिक शांती मिळते. नागिनची वनस्पती जीवनातील अडथळ्यांपासून संरक्षण करते.
असे मानले जाते की आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये आपल्या टेबलाजवळ नागिनीचे रोपे ठेवल्याने करियर किंवा व्यवसायात प्रगती होते आणि कामातील अडथळे दूर होतात.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये नागिनीचे रोप फक्त दक्षिण-पूर्व कोपऱ्यात, पूर्व किंवा दक्षिण दिशेला ठेवणे शुभ असते. नागिनीचा प्लांट लावण्यापूर्वी हे जाणून घ्या की जेव्हा तुम्ही ते लावा तेव्हा ते एकटे लावा. त्याच्या जवळ दुसरी कोणतीही वनस्पती असू नये, अन्यथा ही वनस्पती नकारात्मक ऊर्जा देते.
बेडरुम किंवा दिवाणखान्यात नागिनीचे रोप ठेवल्याने सुख-समृद्धी वाढते.
स्टडी रूममध्ये नागिनीचे रोप ठेवल्याने मुलांचे लक्ष अभ्यासात केंद्रित होते आणि त्यांची एकाग्रता वाढते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :