Vastu Dhan Labh Remedies : लक्ष्मीच्या कृपेसाठी 'या' 5 गोष्टी घरात ठेवा; आर्थिक समस्या होतील दूर
Dhan Labh Remedies : वास्तुशास्त्रानुसार, 5 गोष्टी घरात ठेवल्याने त्या घरातील व्यक्तींवर कायम लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. तुम्हालाही बऱ्याच काळापासून काही आर्थिक समस्या जाणवत असतील तर तुम्ही आजच या 5 वस्तू घरी आणल्या पाहिजे.
Dhan Labh Remedies : वास्तुशास्त्राच्या नियमानुसार, अशा काही गोष्टी आहेत ज्या घरात ठेवल्यास घरात सुख-समृद्धी येते. या वस्तू घरात ठेवल्यास देवी लक्ष्मीची कृपा सदैव पाठीशी राहते आणि कधीही पैशाची तंगी भासत नाही. जर तुम्हाला बरेच दिवसांपासून आर्थिक समस्या भेडसावत असतील तर तुम्ही वास्तुनुसार या 5 गोष्टी घरात ठेवाव्यात, जेणेकरून लक्ष्मी सदैव तुमच्या घरात राहील.
नारळ
जर तुम्हाला सतत आर्थिक समस्येतून जावं लागत असेल तर तुम्ही घरात नारळ अवश्य ठेवावा. घरात श्रीफळ ठेवल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करते.
धातूचे कासव
वास्तुशास्त्रानुसार, कासवाचा संबंध आर्थिक समृद्धीशी आहे. असं मानलं जातं की, देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरात ठेवण्यासाठी आपण भगवान विष्णूची देखील पूजा करावी. कासव हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो, त्यामुळे धातूपासून बनवलेलं कासव घराच्या उत्तर दिशेला ठेवावं, यामुळे आर्थिक तंगी दूर होते.
पिरॅमिड
वास्तुशास्त्रानुसार, क्रिस्टल किंवा इतर कोणत्याही धातूपासून बनवलेलं पिरॅमिड देखील तुमच्या आर्थिक कल्याणाशी जोडलेलं आहे. जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर आजच एक क्रिस्टल पिरॅमिड आणा आणि घरात ठेवा. यामुळे घरात आर्थिक सुबत्ता राहते.
धन कुबेरची मूर्ती किंवा फोटो
लक्ष्मी आणि कुबेर या दोघांनाही संपत्तीची देवी आणि देवता मानलं जातं. जर तुम्हाला लक्ष्मी देवीची कृपा मिळवायची असेल तर कुबेराची मूर्ती किंवा फोटो घरात ठेवा. यामुळे तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास राहील.
देव्हाऱ्यात चांदीचे नाणे ठेवा
देव्हाऱ्यात चांदीचं नाणं ठेवल्याने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. देव्हाऱ्यात चांदीचं नाणं ठेवा आणि त्यावर दररोज लाल तिलक लावा आणि देवी लक्ष्मीच्या आगमनाचा मंत्र जप करा - ओम श्री ह्रीं क्लेम श्री सिद्ध लक्ष्मीयै नमः, यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: