Vastu Shashtra: संपत्ती, कमाई वाढेल.. घरगुती कलहही दूर होतील! फक्त रात्री झोपताना 'या' 5 गोष्टी करा, फार कमी लोकांना माहीत
Vastu Shashtra: माणसाचा जन्म म्हटला तर समस्या या आल्याच, तुम्हीही विविध समस्यांनी वेढलेले असाल तर मग वास्तुशास्त्रानुसार अशा काही उपायांबद्दल जाणून घ्या, जे तुम्ही रात्री करू शकता.

Vastu Shashtra: आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक चांगल्या, वाईट गोष्टींना तोंड देत असतो. रोज नवी समस्या दारात उभी असते. पण जेव्हा आपल्या आजूबाजूला काही सुखी कुटुंबाकडे पाहतो, तेव्हा त्यांचं सुखी असण्यामागे काय कारण असेल? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. त्यावेळी आपल्या घराचे किंवा दैनंदिन जीवनात वास्तुचे नियम पाळले जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे.वास्तुशास्त्र केवळ घराच्या रचनेबद्दलच सांगत नाही तर जीवनात सुख, समृद्धी आणि शांती आणण्यासाठी अनेक सोपे आणि प्रभावी उपाय देखील सांगतात. जीवनातील अडथळे, नकारात्मक ऊर्जा आणि दुर्दैव दूर करायचं असेल तर आज तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार काही उपाय सांगत आहोत, जे केल्यानंतर तुम्हाला फरक जाणवू लागेल.
जीवनात सुख, समृद्धी आणि शांती आणण्यासाठी हे उपाय करा..
जीवनात सुख, समृद्धी आणि शांती आणण्यासाठी अनेकण अनेक उपाय करतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार पाहायला गेलं तर यापैकी एक अतिशय खास उपाय म्हणजे रात्री झोपताना उशीखाली काही शुभ आणि उत्साही वस्तू ठेवणे. या वस्तू तुमच्या आर्थिक, सामाजिक,नातेसंबंधातील समस्या दूर करण्यातही मदत करतात. वास्तुशास्त्रानुसार, जाणून घेऊया कोणत्या खास गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवाव्यात.
हळकुंड - वास्तुशास्त्रानुसार,तुमच्या जीवनात समृद्धी आणि सौभाग्य आणण्यासाठी झोपताना उशीखाली हळकुंड ठेवल्यास चांगले दिवस येण्यास मदत मिळेल. यासोबतच हळकुंड देवघरात ठेवल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते. या उपायाने जीवनात स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा येते.
तमालपत्र - वास्तुशास्त्रानुसार, वाईट स्वप्ने, मानसिक अस्वस्थता आणि वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी तमालपत्र हे एक शक्तिशाली औषधी आणि ऊर्जा संतुलित करणारे पान आहे. त्यावर ॐ शीम हा मंत्र लिहा आणि उशीखाली ठेवा. या उपायाने घरात शांतता आणि संतुलन कायम राहते.
तुळशीचे पान - वास्तुशास्त्रानुसार, मन शांत करण्यासाठी, चिंता आणि भीती कमी करणयासाठी तुळशी एक मोठा उपाय आहे. तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. झोपताना उशीखाली तुळशीचे कोरडे पान ठेवले तर होते. हा उपाय मानसिक स्पष्टता आणि सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देतो.
चांदीचे नाणे - वास्तुशास्त्रानुसार, अनावश्यक खर्च थांबण्यासाठी, तसेच तुमची संपत्ती वाढण्यासाठी चांदी उत्तम उपाय आहे. चांदी ही शुद्धता,चंद्र ऊर्जा आणि शीतलता यांचे प्रतीक आहे. उशीखाली चांदीचे नाणे ठेवल्याने तुमचे आरोग्य सुधारू शकते. यासोबतच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्यांसाठी हा उपाय विशेषतः फायदेशीर आहे.
हेही वाचा :
Weekly Horoscope: एप्रिलचा शेवट, मे महिन्याची सुरूवात असेल अद्भूत! नवा आठवडा नशीब पालटणारा, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















