(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tirupati Balaji Mandir : तिरुपती बालाजी मंदिरात केस का दान करतात? दान केलेल्या केसांचं पुढे काय करतात? जाणून घ्या सविस्तर
Tirupati Balaji Mandir Hair Donation : तिरुपती बालाजीचं मंदिर हे आंध्र प्रदेशात स्थित आहे. या ठिकाणी भगवान विष्णूच्या व्यंकटेश्वर रुपाची पूजा केली जाते. दरवर्षी या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.
Tirupati Balaji Mandir Hair Donation : सध्या तिरुपती बालाजी मंदिराचा (Tirupati Balaji) प्रसाद हा प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. याचं कारण म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार, तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून दिलेल्या लाडूंमध्ये तुपाच्या जागी प्राण्यांच्या चरबीचा आणि माशांचं तेल वापरत असल्याचं आढळून आलं आहे. मंदिर प्रशासनानेदेखील प्रसादात भेसळ झाल्याचं मान्य केलं आहे.
तिरुपती बालाजीचं मंदिर हे आंध्र प्रदेशात स्थित आहे. या ठिकाणी भगवान विष्णूच्या व्यंकटेश्वर रुपाची पूजा केली जाते. दरवर्षी या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.
मंदिरात केस दान करतात
तुम्हाला माहीत आहे का की, तिरुमल या ठिकाणी स्थित असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरात केस दान करण्याला विशेष महत्त्व आहे. या ठिकाणी पुरुष असो वा महिला आपले केस दान करतात. याच मुद्द्याला उद्देषून आपण या ठिकाणी अधिक माहिती जाणून घेणार आहोत की, यामागची नेमकी मान्यता आणि पौराणिक कथा नेमकी काय आहे.
तिरुपती बालाजी मंदिरात केस का दान करतात?
तिरुपती बालाजी मंदिरात केस दान करण्यामागे अशी मान्यता आहे की, या ठिकाणी केस दान केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात कधीच धन-संपत्तीची कमतरता भासत नाही. तसेच, देवी लक्ष्मीची तुमच्यावर सतत कृपा राहते. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते. आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणूनच तिरुपती बालाजी मंदिरात केस दान केले जातात.
दान केलेल्या केसांचं काय करतात?
तिरुपती बालाजी मंदिरात दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक आपले केस दान करतात. या केसांना सर्वात आधी उकळलं जातं, त्यांना धुतलं जातं, धुतलेल्या केसांना पुढे सुकवतात आणि त्यांना योग्य तापमानात स्टोर करुन ठेवतात. ही प्रक्रिया केल्याने केस स्वच्छ राहतात. त्यानंतर या केसांची निलामी करुन त्यांची विक्री केली जाते. ही निलामी ऑनलाईन पद्धतीची असून तिरुमाला तिरुपती देवस्थानाद्वारे ती आयोजित केली जाते. या केसांच्या निलामीतून लाखो रुपयांचा फंड गोळा केला जातो. या केसांना युरोप, अमेरिका, चीन, आफ्रिकासह अनेक देशांत या केसांना फार महत्त्व आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :