एक्स्प्लोर

Swapna Shastra : तुम्हाला स्वप्नातही सिंह दिसतो का? याचा अर्थ काय? स्वप्नशास्त्रावरून जाणून घ्या

Swapna Shastra : अनेकांना त्यांच्या स्वप्नात काही प्राणी दिसतात. जर तुम्हाला स्वप्नात सिंह दिसला तर त्याचे अनेक अर्थ असू शकतात.

Swapna Shastra : बहुतेक लोक झोपेत स्वप्न पाहतात. स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो. यामध्ये प्रत्येक स्वप्नाचे तपशीलवार वर्णन केले आहे. स्वप्ने आपल्याला भविष्यातील घडामोडींची माहिती देतात. अनेकांना त्यांच्या स्वप्नात काही प्राणी दिसतात. जर तुम्हाला स्वप्नात सिंह दिसला तर त्याचे अनेक अर्थ असू शकतात. स्वप्नात सिंह दिसण्याचा अर्थ काय आहे? आणि तो शुभ की अशुभ मानला जातो, हे स्वप्न शास्त्रावरून जाणून घ्या.

स्वप्नात सिंह येतो? याचा अर्थ काय?

सिंह ही अनेक देवी-देवतांची स्वारी आहे. स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात सिंह दिसणे शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात कोणतीही समस्या येईल, तुम्ही त्याचा सहज सामना करू शकाल. सिंह सूचित करतो की तुमचे कठीण दिवस संपले आहेत आणि चांगले दिवस लवकरच येणार आहेत. स्वप्नात सिंह दिसणे म्हणजे तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे. सिंह आणि सिंहिणीच्या जोडीचे स्वप्न पाहणे देखील चांगले लक्षण मानले जाते.

सिंहावर स्वार झालेल्या महिलेचे स्वप्न
जर तुम्ही तुमच्या स्वप्नात सिंहावर बसलेली स्त्री पाहिली असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या स्वप्नात दुर्गा मातेचे दर्शन झाले आहे. सिंह ही दुर्गामातेचे वाहन आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या स्वप्नात दुर्गा मातेचे दर्शन घेतले आहे. स्वप्नात देवीचे दर्शन होणे खूप शुभ मानले जाते. म्हणजे तुम्हाला देवीचा आशीर्वाद आहे आणि तुमची सर्व कामे यशस्वी होणार आहेत.

'असे' ढग दिसणे शुभ मानले जाते.

स्वप्नात ढग दिसणे शुभ लक्षण मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार मेघ व्यक्तीचे यश आणि सन्मान दर्शवतो. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात ढग निघून जाताना दिसले तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात यश, पैसा दार ठोठावणार आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये झटपट प्रगती करू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही मेघगर्जनेचे स्वप्न पाहत असाल तर तुम्हाला लवकरच काही चांगली बातमी मिळू शकते. अनेकदा मेघगर्जना हे देखील सूचित करतात की, आपण एखाद्याच्या रागाचे बळी पडू शकता. त्यामुळे थोडे सावध राहावे लागेल.

काळ्या ढगांचे स्वप्न पाहणे अशुभ

स्वप्नात काळे ढग दिसणे शुभ मानले जात नाही. हे स्वप्न काही मोठे नुकसान दर्शवते. काळे ढग सूचित करतात की तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारचे संकट एकत्र येणार आहेत. तुमच्यासोबत काही अशुभ घटना घडू शकते, त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ 
प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो. काही स्वप्ने माणसाच्या लक्षात राहतात तर काही स्वप्ने सकाळी उठल्यावर विसरली जातात. ज्या लोकांना त्यांची स्वप्ने आठवतात त्यांचा अर्थ जाणून घेण्यात खूप रस असतो. स्वप्न शास्त्रामध्ये प्रत्येक स्वप्नाचे वर्णन केले आहे. ही स्वप्ने आपल्याला भविष्यातील घडामोडींची माहिती देतात. जर तुम्हालाही वारंवार सरडे पाहण्याची स्वप्ने पडत असतील तर ते अशुभ लक्षण असू शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ 

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा 7 राशींचं नशीब पालटणार! देव दिवाळी संपताच दुर्मिळ योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम...12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य..
नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा 7 राशींचं नशीब पालटणार! देव दिवाळी संपताच दुर्मिळ योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम...12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य..
Horoscope Today 19 November 2026: आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्लभ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्लभ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
December Grah Gochar 2026 : 2026 वर्ष संपता-संपता 'या' 5 राशींवर होणार सुखाची बरसात; 4 मोठ्ठ्या ग्रहांच्या संक्रमणाने पैशांचा पडणार धो-धो पाऊस, ऐशोआरामात जगाल
2026 वर्ष संपता-संपता 'या' 5 राशींवर होणार सुखाची बरसात; 4 मोठ्ठ्या ग्रहांच्या संक्रमणाने पैशांचा पडणार धो-धो पाऊस, ऐशोआरामात जगाल
Rahu Ketu Gochar 2026 : वर्षाच्या शेवटी राहू-केतूचं होणार महासंक्रमण; 5 डिसेंबरपासून 5 राशींच्या जीवनात घडतील 'हे' बदल, वर्षाची सुरुवातच होणार भन्नाट
वर्षाच्या शेवटी राहू-केतूचं होणार महासंक्रमण; 5 डिसेंबरपासून 5 राशींच्या जीवनात घडतील 'हे' बदल, वर्षाची सुरुवातच होणार भन्नाट

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
Embed widget