Surya Grahan 2025 : हिंदू नववर्ष सुरु होण्यापूर्वीच लागणार 2025 वर्षातलं पहिलं सूर्य ग्रहण; 'या' राशींच्या लोकांनी राहावं सावध
Surya Grahan 2025 : ज्या दिवशी 2025 वर्षाचा पहिला सूर्य ग्रहण लागणार आहे त्या दिवशी सर्वात मोठं संक्रमण होणार आहे. शनी ग्रह 29 मार्च 2025 रोजी राशी परिवर्तन करणार आहे.
Surya Grahan 2025 : नवीन वर्षाची (New Year) सुरुवात अवघ्या काही तासांतच होणार आहे. या वर्षाची उत्सुकता असतानाच महत्त्वाची बातमी आहे ते म्हणजे 2025 वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण (Surya Grahan) हिंदू नववर्षाच्या आधीच लागणार आहे. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात 30 मार्च 2025 रोजी होणार आहे. तसेच, हिंदू नववर्षाचा पहिला महिना चैत्र महिना असणार आहे. या दिनाला नव वर्ष संवत्सर, गुढीपाडवा या नावाने देखील ओळखलं जातं.
ज्या दिवशी 2025 वर्षाचा पहिला सूर्य ग्रहण लागणार आहे त्या दिवशी सर्वात मोठं संक्रमण होणार आहे. शनी ग्रह 29 मार्च 2025 रोजी राशी परिवर्तन करणार आहे. शनीचं हे राशी परिवर्तन आणि सूर्य ग्रहण एकाच दिवशी होणार आहे. यामुळे अनेक राशींसाठी हा काळ संकटाचा ठरु शकतो.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
वर्षाच्या पहिल्या सूर्य ग्रहणाच्या दिवशी शनी ग्रहाचं राशी परिवर्तनसुद्धा होणार आहे. या काळात कुंभ राशीच्या लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागेल. तसेच, जर तुम्हाला एखाद्या नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सतर्क राहावं लागेल. तसेच, पैशांचा जपून वापर करावा.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांना सूर्य ग्रहणाच्या दिवशी सावध राहण्याची गरज आहे. या दरम्यान तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन जॉब शोधण्यासाठी अनेक कष्ट करावे लागतील. तुमच्या आरोग्याच्या बाबतीत चढ-उतार जाणवतील.
'या' मंत्रांचा जप करा
ॐ घृणि सूर्याय नम: ।।
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा।।
ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:।।
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :