(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Surya Grahan 2024 : यंदाचं दुसरं आणि शेवटचं सूर्य ग्रहण कधी लागणार? मिथुनसह 'या' राशींना सोसावं लागणार दु:ख
Surya Grahan 2024 : असं म्हटलं जातं की, यावर्षीचं सूर्य ग्रहण काही राशींच्या लोकांसाठी चांगले मानले जाणार नाही. पण, काही खास गोष्टींची काळजी घेतली तर याच्या वाईट परिणामांपासून तुम्ही वाचू शकता.
Surya Grahan 2024 : वर्षातलं दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण नुकतंच झाल्यानंतर 2024 या वर्षातलं दुसरं सूर्य ग्रहण (Surya Grahan) लवकरच पार पडणार आहे. पंचांगानुसार, यावर्षीचं दुसरं सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर 2024 रोजी लागणार आहे. या कालावधीत काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण, सूर्य ग्रहणाचा हा काळ अशुभ मानला जातो. यामुळे व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडतो.
असं म्हटलं जातं की, यावर्षीचं सूर्य ग्रहण काही राशींच्या लोकांसाठी चांगले मानले जाणार नाही. पण, काही खास गोष्टींची काळजी घेतली तर याच्या वाईट परिणामांपासून तुम्ही वाचू शकता.
मिथुन रास (Gemini Horoscope)
यावर्षीचं दुसरं सूर्य ग्रहण मिथुन राशीच्या लोकांसाठी फारसं चांगलं नसणार आहे. या काळात तुमच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात अडथळा येऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला धनहानी देखील होऊ शकते. त्यामुळेच मिथुन राशीच्या लोकांनी थोडं सावधानतेने लक्ष देणं गरजेचं आहे. याशिवाय भगवान विष्णूची विधीवत पूजा करा आणि वैदिक मंत्रांचा जप करा. तर, तुम्हाला भविष्यात चांगली संधी मिळू शकते.
कर्क रास (Cancer Horoscope)
सूर्यग्रहणाचा नकारात्मक प्रभाव कर्क राशीच्या लोकांवर होणार आहे. या दरम्यान तुमच्या कामकाजावर त्याचा परिणाम होऊ शकतो. कठोर मेहनत करुनही तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही. त्यामुळे या काळात तुम्ही जास्तीत जास्त धार्मिक कार्याशी जोडले जाल. भगवान विष्णूची पूजा करा आणि त्यांच्या मंत्रांचा जप करा. त्याचबरोबर कुठेही गुंतवणूक करु नका.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा संघर्षाचा असणार आहे. या काळात तुम्ही कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विनाकारण खर्च करु नका. या काळात भगवान शंकराची पूजा करा. तसेच, कोणाबद्दलही अपशब्द किंवा वाईट विचार मनात आणू नये. सकारात्मक दृष्टीकोण ठेवावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :
Surya Grahan 2024 : सूर्य ग्रहणात कसं कराल पितरांचं श्राद्ध? भारतात काय कसा होणार सूर्य ग्रहणाचा प्रभाव? जाणून घ्या सविस्तर