Surya Gochar 2025 : कर्क राशीत होणार सूर्याचं संक्रमण, 16 जुलैपासून 'या' राशींचे 'अच्छे दिन', मिळणार लाभच लाभ
Surya Gochar 2025 : येत्या 16 जुलै 2025 रोजी सूर्य ग्रह कर्क राशीत संक्रमण करणार आहे. सूर्य ग्रहाच्या संक्रमणाचा 5 राशींना चांगला लाभ मिळणार आहे.

Surya Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य ग्रह (Surya Gochar) येत्या 16 जुलै 2025 रोजी कर्क राशीत संक्रमण करणार आहे. सूर्य ग्रहाच्या संक्रमणाचा 5 राशींना चांगला लाभ मिळणार आहे. या राशींच्या लोकांचं नशीब उजळू शकतं. तसेच, तुमच्या करिअरमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. कर्क राशीत सूर्य ग्रहणाच्या संक्रमणामुळे तुमच्यातील संवेदनशीलता वाढेल. तसेच, सूर्य ग्रहाच्या संक्रमणामुळे या राशींच्या लोकांना नवीन संकल्पनांचा लाभ घेता येईल. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
सूर्य ग्रहाच्या संक्रमणामुळे मिथुन राशीला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती या काळात चांगली राहील. तुमची रखडलेली कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसेल. व्यक्तिमत्व उठून दिसेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
सूर्य ग्रहाचं संक्रमण कर्क राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्यातील नेतृत्वक्षमता दिसून येईल. जर तुम्हाला एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करायची असेल तर तुमच्यासाठी हा योग्य काळ आहे. मात्र, तुम्हाला अहंकार आणि राग बाजूला ठेवावा लागेल. तसेच, आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. या काळात सामाजिक क्षेत्रात तुमची प्रगती दिसून येईल. तुमच्या उत्पन्नात वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्यातील लीडरशीप क्वालिटी दिसून येईल. कोणतीही गोष्ट घाईगडबडीत करु नका.
तूळ रास (Libra Horoscope)
सूर्याच्या संक्रमणाने तूळ राशीच्या लोकांना लाभ मिळेल. या काळात कामाच्या ठिकाणी तुमची नेतृत्वक्षमता वाढलेली दिसेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या पदोन्नतीत वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या कामाचं समाजात कौतुक होईल. नवीन लोकांशी भेटीगाठी वाढतील.
मीन रास (Pisces Horoscope)
सूर्याचं राशी परिवर्तन मीन राशीसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. तसेच, प्रेम संबंधांमध्ये जवळीकता वाढलेली दिसेल. या काळात तुम्हाला चांगली शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, संगीत, नाटक, अभिनय क्षेत्राशी संबंधित लोकांना लाभ मिळू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















