Shani Vakri 2025 : सावधान! 13 जुलैपासून सुरु होतेय शनीची वक्री चाल; 'या' 4 राशींची सुरु होणार सर्वात कठीण परीक्षा, ताकही फुंकून प्या
Shani Vakri 2025 : येत्या 13 जुलै 2025 पासून शनिची वक्री चाल सुरु होणार आहे. हा काळ काही राशींसाठी शुभ-अशुभ असणार आहे. मात्र, या कालावधीत चार राशींच्या लोकांवर शनीची वक्री नजर असणार आहे.

Shani Vakri 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी (Shani Dev) ग्रहाला कर्मफळदाता म्हणतात. शनि (Shani Vakri) महाराज प्रत्येक राशीच्या लोकांना आपल्या कर्मानुसार फळ देतात. तसेच, येत्या 13 जुलै 2025 पासून शनिची वक्री चाल सुरु होणार आहे. हा काळ काही राशींसाठी शुभ-अशुभ असणार आहे. मात्र, या कालावधीत चार राशींच्या लोकांवर शनीची वक्री नजर असणार आहे. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या द्वादश चरणात शनी वक्री चाल चालणार आहेत. या काळात तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुमच्या खर्चात अचानकपणे वाढ झालेली दिसेल. करिअरमध्ये अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, ऑफिस पॉलिटिक्सचा तुम्ही भाग ठरु शकता.
मिथुन रास (Gemini Horoscope)
शनीची वक्री चाल मिथुन राशीसाठी देखील संकटाची ठरु शकते. या काळात तुमच्या जीवनावर याचा नकारात्मक परिणाम दिसून येईल. तसेच, तुमची मेहनत पूर्णपणे वाया जाईल. या काळात सतत तुमच्या कुटुंबात वाद निर्माण झालेली दिसतील. तसेच, मानसिकदृष्ट्या तुम्ही फार चिंतेत असाल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या अष्टम चरणात शनीची वक्री चाल होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अनिश्चित आणि दुर्घटनांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, या काळात चुकूनही वाहन खरेदी करु नका. कुटुंबातील वातावरण देखील तणावाचे असेल. तसेच, या काळात तुम्हाला मनाप्रमाणे काम करता येणार नाही. तसेच, शक्यतो या काळात दूरचा प्रवास करणं टाळा. कारण यामुळे तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो.
धनु रास (Sagittarius Horoscope)
शनीच्या वक्री चालीचा धनु राशीवर देखील परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे या काळात कोणतीही जोखीम हाती घेऊ नका. अनैतिक कार्यापासून दर राहा. तसेच, तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कारण यामुळे अनेकजण दुखावू शकतात. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आणखी मेहनत करण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकरणात अडकू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















