Surya Gochar : सूर्याचा गुरुच्या नक्षत्रात प्रवेश; 6 नोव्हेंबरपासून 'या' 3 राशी राजासारखं जगतील आयुष्य, मालामाल होण्याची मिळणार सुवर्णसंधी
Surya Gochar 2025 : दृक पंचांगानुसार, सूर्य देवाचं पुढचं नक्षत्र परिवर्तन 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजून 59 मिनिटांनी होणार आहे. या काळात 19 नोव्हेंबरपर्यंत सूर्य याच राशीत स्थित असणार आहे.

Surya Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यदेवाला (Sun) ग्रहांचा राजा म्हणतात. त्यानुसार, सूर्याचं राशी परिवर्तन देखील अनेक राशींवर परिणाम करतं. येत्या 6 नोव्हेंबर रोजी सूर्य आपल्या चालीत बदल करणार आहे. या काळात सूर्य तूळ राशीत विराजमान राहून नक्षत्र परिवर्तन करणार आहे. या काळात दुपारच्या दरम्यान सूर्याचं विशाखा नक्षत्रात परिवर्तन होणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाचा सर्व राशींवर परिणाम होतो. दृक पंचांगानुसार, सूर्य देवाचं पुढचं नक्षत्र परिवर्तन 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजून 59 मिनिटांनी होणार आहे. या काळात 19 नोव्हेंबरपर्यंत सूर्य याच राशीत स्थित असणार आहे. त्यामुळे काही राशींना मालामाल होण्याची पूर्ण संधी आहे. या लकी राशी कोणत्या के जाणून घेऊयात.
सिंह रास (Leo Horoscope)
ग्रहांचा राजा सूर्याचं नक्षत्र परिवर्तन सिंह राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे. या काळात कायदेशीर गोष्टींमध्ये तुम्हाला य मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायातून तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळेल. एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ फार अनुकूल ठरणार आहे. तसेच, गुंतवणुकीच्या संदर्भात तुम्ही घेतलेल्या निर्णयात तुम्हाला यश मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी सूर्याचं नक्षत्र परिवर्तन फार प्रभावशाली ठरणार आहे. या काळात तुम्ही जे निर्णय घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. धनसंपत्तीत चांगली भरभराट होईल. तसेच, या काळात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी ग्रहांचा राजा सूर्याचं संक्रमण लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. तसेच, सूर्यदेवाच्या कृपेने समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळू शकतो. व्यवसायात कामाच्या दुप्पट ऑर्डर्स तुम्हाला मिळतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















