Surya Gochar : 1 वर्षानंतर सूर्याचं 'महासंक्रमण'! धन-संपत्तीने भरभरुन राहतील 'या' 5 राशी; 30 दिवस राहाल टेन्शन फ्री
Surya Gochar 2025 : सूर्याचं हे संक्रमण फार खास ठरणार आहे. कारण एक वर्षानंतर सूर्य पुन्हा मेष राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य ग्रह प्रत्येक महिन्याला संक्रमण करतात.

Surya Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्याचं (Surya Gochar) 14 एप्रिल रोजी राशी परिवर्तन होणार आहे. सूर्याचं संक्रमण होऊन सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे 5 राशींना चांगला लाभ मिळेल. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
सूर्याचं हे संक्रमण फार खास ठरणार आहे. कारण एक वर्षानंतर सूर्य पुन्हा मेष राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य ग्रह प्रत्येक महिन्याला संक्रमण करतात. तर संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी सूर्याला एक वर्षाचा कालावधी लागतो. त्यानुसार, 14 एप्रिल रोजी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
सूर्य ग्रहाचं संक्रमण मेष राशीत होणार आहे. मेष राशीच्या मंगळ आणि सूर्यात मित्रत्वाचा भाव आहे. त्यामुळे या संक्रमणाचा तुम्हाला लाभच मिळणार आहे. त्याचबरोबर तुमची साडेसातीपासून देखील सुटका होईल. तुमचं वैवाहिक जीवन चांगलं राहील. तसेच, नातं अधिक घट्ट होईल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
सूर्याचं संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला करिअरमध्ये अप्रात्यक्षिकपणे लाभ मिळेल. तसेच, देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असल्या कारणाने तुम्हाला अचानक धनलाभ मिळेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना चांगला लाभ मिळेल. या काळात तुमचे शत्रू देखील तुमचं काही बिघडवू शकणार नाहीत.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्याचं संक्रमण भाग्यशाली ठरणार आहे.या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुम्हाला प्रमोशनदेखील मिळण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. जेणेकरुन तुम्हाला नक्कीच आनंद होईल.
कर्क रास (Cancer Horoscope)
सूर्याचं संक्रमण कर्क राशीच्या लोकांना मोठा लाभ देऊन जाणार आहे. नुकतीच कर्क राशीच्या लोकांना शनीच्या ढैय्यापासून मुक्ती मिळाली आहे. त्यामुळे सूर्याच्या संक्रमणाने देखील तुम्हाला चांगला लाभ मिळेल. एखादं नवीन प्रोजेक्टवर तुम्ही काम करायला सुरुवात करु शकता.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. त्यामुळे सूर्याची या राशीवर कृपादृष्टी असणार आहे. सिंह राशीच्या लोकांची या काळात अनेक रखडलेली कामे पूर्ण करता येतील. साडेसातीचा काळ देखील सुरु असला तरी सूर्याच्या मदतीने तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















