(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Dev : तब्बल 30 वर्षांनंतर शनि कुंभ राशीत मार्गी, 'या' 3 राशींना येणार सोन्याचे दिवस, नोकरी-व्यवसायात मिळणार यशच यश
Shani Margi 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, अवघ्या काही दिवसांत शनि कुंभ राशीत वक्री सोडून सरळ चाल चालेल, ज्यामुळे 3 राशीच्या लोकांचं नशीब उजळेल आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
Shani Margi 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर त्याची चाल बदलतो. ग्रह कधी सरळ चाल चालतात, तर कधी वक्री होतात. जून महिन्यात शनि (Shani) स्वत:च्या राशीत, म्हणजेच कुंभ राशीत वक्री झाला आहे. यानंतर आता नोव्हेंबरमध्ये शनि मार्गी होत सरळ चाल चालेल. शनीची बदलती चाल सर्व राशींवर परिणाम करेल, या काळात कुंभसह 3 राशींच्या नशिबाला कलाटणी मिळेल. या लोकांना नोकरी आणि व्यवसायात बढती मिळू शकते. या 3 भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
कुंभ रास (Aquarius)
शनीची थेट चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीतून थेट चढत्या घरात जाणार आहेत.या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक उत्तम संधी मिळतील आणि पैसे वाचवता येतील. या काळात तुम्हाला प्रसिद्धी मिळेल, तुमचा मान-सन्मानही वाढेल. तुम्ही समाजातील मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तींना भेटाल, ज्यांचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. तसेच, या काळात विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन चांगलं राहील, तर अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
वृषभ रास (Taurus)
शनीची प्रत्यक्ष चाल वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते, कारण शनिदेव तुमच्या राशीच्या कर्म घरात मार्गी होणार आहे. या काळात नोकरी आणि व्यवसायात तुमची विशेष प्रगती होऊ शकते. तुम्ही तुमच्या ध्येयांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला चांगले पैसे मिळतील. तसेच नोकरदार लोकांना यावेळी बढती मिळू शकते, तर बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात.
मिथुन रास (Gemini)
शनीची प्रत्यक्ष चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, यावेळी तुम्हाला नशिबाची चांगली साथ देईल. याशिवाय तुम्ही नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करू शकता. तुमचं सोशल सर्कल वाढेल आणि मान-सन्मानात वाढ होईल. नशिबाने साथ दिल्याने तुमची सर्व कामं सहज पूर्ण होतील आणि तुमचं मन प्रसन्न राहील. तसेच ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचं आहे, त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. यावेळी तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होऊ शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: