Surya Gochar 2024 : दिवाळीनंतर नीच राशीतून सूर्याचं संक्रमण; 'या' 3 राशींचे उघडणार नशिबाचे दार, जगणार राजासारखं आयुष्य
Surya Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, दिवाळीनंतर 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 07 वाजून 16 मिनिटांनी सूर्य तूळ राशीत निघून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे.
Surya Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. ग्रहांच्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर होतो. हे राशी परिवर्तन काही राशींसाठी शुभ असते तर काही राशींसाठी अशुभ असते. त्यामुळे दिवाळीनंतर (Diwali 2024) ग्रहांचा राजा सूर्यसुद्धा (Sun) राशी परिवर्तन करणार आहे. या प्रभाव कोणत्या राशींवर (Zodiac Signs) बोणार आहे ते जाणून घेऊयात.
दिवाळीनंतर सूर्याचं राशी परिवर्तन
ज्योतिष शास्त्रानुसार, दिवाळीनंतर 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 07 वाजून 16 मिनिटांनी सूर्य तूळ राशीत निघून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. यापैकी 3 राशींसाठी हा काळ शुभ असणार आहे. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये प्रचंड यश मिळेल. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभाचे योग आहेत. तसेच, अनेक काळापासून रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. व्यापारी वर्गातील लोकांना या काळात चांगली डील मिळेल. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. दांपत्य जीवन सुखी राहील. तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर नवीन व्यवसाय सुरु करु शकता.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. या काळात तुमची धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. तसेच, जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. तुम्हाला तुमच्या आवडीचा जॉब मिळू शकतो. तसेच, जर तुम्ही गुंतवणूकर करणार असाल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. व्यापारी वर्गाचा व्यवसाय वाढेल. या राशीच्या लोकांना मित्राचा चांगला सहभाग मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. तुमची आर्थिक तंगीपासून सुटका होईल. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. अचानक धनलाभही होऊ शकतो. तसेच, अनेक दिवसांपासून तुम्ही एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगलं यश मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: