(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Gochar : 2025 मध्ये 'या' राशींना शनी बनवणार धनवान; मागाल ती इच्छा होणार पूर्ण, 'हे' संकेत ठरतील महत्त्वाचे
Shani Gochar : शनीने 2023 मध्ये कुंभ राशीत प्रवेश केला होता ते 2025 पर्यंत शनी कुंभ राशीतून निघनू मीन राशीत प्रवेश करणार आहे.
Shani Gochar : ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनीला (Shani Dev) कोणत्याही राशीत स्थिर राहण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. शनीला न्यायाधीश आणि दंडाधिकारी म्हणतात. जी व्यक्ती चांगलं कर्म करते अशा व्यक्तींना शनी (Lord Shani) चांगलं फळ देतात. तर, ज्या व्यक्तीचं कर्मच वाईट असते अशा व्यक्तींना शनी शिक्षाही देतात. शनी सध्या आपली मूळ रास म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. यामुळे शश राजयोग निर्माण झाला आहे.
शनीने 2023 मध्ये कुंभ राशीत प्रवेश केला होता ते 2025 पर्यंत शनी कुंभ राशीतून निघनू मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनी 29 मार्च 2025 रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीत प्रवेश केल्यानंतर शनीची साडेसाती संपेल आणि मेष राशीत साडेसाती सुरु होईल. यामुळे कोणकोणत्या राशींवर (Zodiac Signs) याचा परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
शनीच्या संक्रमणाने मेष राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु होईल. मात्र, शनी जर द्वादश चरणात, सहाव्या आणि नवव्या चरणात असल्यामुळे शनीची पिडा होणार नाही. त्यामुळे या काळात तुम्ही शनीचे काही उपाय करुन साडेसाती दूर करु शकता. तसेच, या काळात तुम्ही धार्मिक यात्रेला देखील जाण्याचा बेत करु शकता. तसेच, शनीची कृपा असल्यामुळे तुम्ही आर्थिक बाबतीत देखील संपन्न असाल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांवर शनीच्या संक्रमणाचा काहीही परिणाम होणार नाही. या काळात तुम्हाला तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात चांगलं यश मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यापाराच्या दृष्टीने बोलायचं झाल्यास, तुमचा व्यवसाय फार वेगाने चालेल. यासाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण असेल त्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवणार नाही. तसेच, शनीदेवाची कृपा असल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमचं आरोग्यही चांगलं राहील. तसेच, कुटुंबातील वातावरण प्रसन्न असेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राश ही शनीची रास असल्यामुळे या राशीच्या लोकांना लवकरच चांगले दिवस येतील. तसेच, तुमच्याधन-संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तुम्ही केलेल्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. तसेच, तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमच्या इच्छेनुसार, तुम्हाला फळ मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: