Astrology : पुढील एक महिन्यापर्यंत 'या' राशींना सोन्याचे दिवस; नशीब देणार साथ, होणार धन लाभ
Surya Gochar in Makar 2024 : सूर्याने मकर राशीत प्रवेश केला आहे, मकर राशीतील सूर्याच्या या मार्गक्रमणाला मकर संक्रांत म्हणतात. यंदा मकर संक्रांतीपासून एक महिन्यापर्यंत चार राशीच्या लोकांचे सोन्याचे दिवस सुरू होणार आहेत.
Sun Transit In Capricorn 2024 : ग्रहांचा राजा सूर्याचं सर्व राशीतील मार्गक्रमण खूप खास असतं, पण यापैकी सूर्याचा मकर राशीतील प्रवेश विशेष असतो. ज्या दिवशी सूर्य आपला पुत्र शनि याच्या मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवसाला मकर संक्रांत म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि शनि यांच्यात शत्रुत्वाची भावना असते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत, म्हणजेच शनीच्या घरी येतो आणि तिथे महिनाभर राहतो. सूर्य आणि शनि या दोघांची कृपा मिळण्यासाठी हा काळ खास आहे. सूर्य महिनाभर मकर राशीत राहून 4 राशीच्या लोकांवर आपली विशेष कृपादृष्टी ठेवेल. या 4 भाग्यवान राशींबद्दल (Zodiac Signs) जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचं मार्गक्रमण खूप चांगलं असणार आहे. या लोकांना अचानक पैसे मिळू शकतात. तुम्ही परदेशात मालमत्ता खरेदी करू शकता किंवा परदेशातून काही नफा मिळवू शकता. तुमच्या करिअरसाठी हा काळ उत्तम आहे आणि खूप प्रगती देणारा आहे. तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीकडून उच्च पदासाठी नोकरीची ऑफर मिळू शकते. या एक महिन्याच्या काळात तुमचं उत्पन्न वाढेल. व्यवसायासाठीही वेळ चांगला आहे.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांना सूर्य खूप लाभ देईल. नोकरीत तुम्हाला बढती मिळू शकते. नवीन चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे. तुमचा मान-सन्मान वाढेल. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीतून लाभ होईल.
धनु रास (Sagittarius)
सूर्याचं मार्गक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी प्रत्येक टप्प्यावर अनुकूल राहील. व्यवसायातून लाभ होईल. तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. करिअरसाठीही वेळ चांगला आहे. मेहनतीच्या जोरावर तुम्ही खूप काही साध्य कराल. लोक तुमची प्रशंसा करतील. तुमचं उत्पन्न वाढेल.
मीन रास (Pisces)
सूर्याचं राशीबदल मीन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. हे लोक प्रत्येक काम जिद्दीने पूर्ण करतील. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगले परिणाम मिळतील. तुम्हाला मोठं पद मिळू शकतं. आयुष्यात खूप आनंद मिळेल. पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. कमाईसोबतच बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. जोडीदारासोबतचं नातं अधिक घट्ट होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: