(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sun Transit : 13 एप्रिलपासून 'या' 3 राशींना येणार अच्छे दिन; सूर्यासारखं चमकणार नशीब, होणार आर्थिक भरभराट
Sun Transit In Aries : सूर्यदेवाला ज्योतिषशास्त्रात विशेष स्थान प्राप्त आहे. सूर्यदेवाला ग्रहांचा राजा म्हणतात. सूर्यदेव जेव्हा शुभ स्थितीत असतात तेव्हा व्यक्तीचं भाग्य उजळतं.
Sun Transit In Aries : ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवांना विशेष स्थान आहे. सूर्य देवाला सर्व ग्रहांचा राजा म्हणतात. जेव्हा सूर्य शुभ स्थितीत असतो तेव्हा माणसाला सुख-सौभाग्य प्राप्त होतं. आता 13 एप्रिलला सूर्य राशी बदलणार आहे. या दिवशी सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या राशी बदलामुळे काही राशीच्या लोकांचं नशीब उजळेल, तर काही राशीच्या लोकांना या काळात सावध राहण्याची गरज आहे.
जेव्हा सूर्य शुभ स्थितीत असतो तेव्हा व्यक्तीचं निद्रिस्त भाग्यही जागृत होतं. 13 एप्रिलला सूर्य मेष राशीत प्रवेश करताच काही राशींचे चांगले दिवस सुरू होतील. या 3 भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
सूर्याचा राशी बदल हा मेष राशीतच होत आहे, सुर्याचा संक्रमण काळ मेष राशीसाठी शुभ ठरणार आहे. हे संक्रमण मेष राशीला प्रचंड यश मिळवून देईल. या काळात तुमच्या संपत्तीत वाढ होईल, तुम्ही आर्थिकदृष्ट्या आणखी ताकदवान बनाल. भौतिक सुखसोयी तुमच्या वाट्याला येतील. पण या शुभ संयोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुम्ही संयम आणि चिकाटी राखणं गरजेचं आहे. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील. या काळात केलेली गुंतवणूक तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
मिथुन रास (Gemini)
सूर्याच्या संक्रमणामुळे तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. कामावर तुमची नेतृत्व क्षमता वाढेल आणि तुमचे अधिकार वाढतील. तुमचं व्यक्तिमत्व इतरांना आकर्षित करेल आणि तुमचा आत्मविश्वास तुम्हाला योग्य मार्गाकडे नेईल. तुमचं घर आनंदाने भरलेलं असेल आणि तुमची आर्थिक प्रगती होईल. समाजात तुमचं नाव होईल. तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल. बराच काळापासून अडकलेले पैसेही मिळतील. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल.
सिंह रास (Leo)
मेष राशीतील सूर्याचं मार्गक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. करिअरमध्ये भरघोस यश मिळेल. तुमच्या दृढनिश्चयाने तुम्ही यशाच्या पायऱ्या चढाल. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तुमच्या मेहनतीने तुमचा बँक बॅलन्स वाढू शकतो. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :