एक्स्प्लोर

Somvar Upay : सोमवारी करा 'हा' छोटा उपाय! कर्ज, आजार, मानसिक ताण... मोठ्यातली मोठी अडचण होईल दूर; सदैव राहील महादेवाची कृपा

Monday Upay : सोमवारी लोक शंकराला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. दर सोमवारी महादेवाची नित्यनियमाने पूजा केल्याने सर्व अडचणी दूर होतात, असं मानलं जातं.

Monday Remedies : सोमवार हा भगवान भोलेनाथला समर्पित आहे. सोमवारी भगवान शंकराची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. सोमवारी भाविक उपवास करतात आणि खऱ्या मनाने भगवान शंकराची पूजा करतात. असे म्हणतात की भोलेनाथ अतिशय भोळे असून भक्तांवर लवकर प्रसन्न होतात. या दिवशी लोक भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. असे मानले जाते की सोमवारी काही सोपे उपाय केल्यास कर्जापासून मुक्ती मिळू शकते. चला या उपायांबद्दल जाणून घेऊया.

जीवनातील सर्व अडचणी होतील दूर

सोमवारी मनापासून भगवान शिवाची आराधना केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी सकाळी उठून स्नान करून शंकराची पूजा करावी.

अभिषेक केल्याने महादेव होतील लवकर प्रसन्न

सोमवार हा शिवपूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी भोलेनाथाचा अभिषेक करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी शिवलिंगावर चंदन, अक्षत, बेलाची पाने, धतुरा, दूध आणि गंगाजल अर्पण केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात, असं मानलं जातं.

कर्जापासून मुक्त होण्यास मदत करतो हा उपाय

शिवपुराणानुसार, जर तुम्ही कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल तर सोमवारी अक्षता, म्हणजेच तांदूळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अर्पण करा. यामुळे कर्जाच्या समस्येतून दिलासा मिळतो.

या उपायाने जीवनातील अडथळे दूर होतील

पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. सोमवारी हा उपाय केल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते.

वैवाहिक जीवन होईल सुखी

सोमवारी भगवान शंकराला तूप, साखर, गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं.  भोलेनाथाची उदबत्ती आणि दिवा लावून आरती करावी आणि प्रसाद वाटप करावा. असं केल्याने शिवाच्या कृपेने सर्व संकटं दूर होतात आणि वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदते.

कुटुंबात परस्पर प्रेम राहील कायम

पाण्यात जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सुख-सुविधा वाढतात आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो. शिवपुराणानुसार, भगवान शंकराला गव्हापासून बनवलेले पदार्थ अर्पण करणं श्रेष्ठ मानलं जातं. तसेच सोमवारी गहू दान केल्याने कुटुंबात वृद्धी होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.

घरात नांदेल सुख-शांती

सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप केल्याने भगवान शंकराची विशेष कृपा प्राप्त होते. या दिवशी कच्च्या गाईचं दूध शिवलिंगावर अर्पण करणं देखील एक प्रभावी उपाय मानला जातो. सोमवारी अंघोळ केल्यावर पांढरे वस्त्र परिधान करावे. या दिवशी पांढर्‍या रंगाचे खाद्यपदार्थ गरजूंना दान करावे,. यामुळे कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि घरात सुख-शांती नांदते.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Numerology : प्रचंड गर्विष्ठ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; स्वत:लाच समजतात शहाणे, दुसऱ्यांना कमी लेखण्यात सर्वात पुढे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 6 मार्चचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनलाभाचे संकेत, वाचा लकी राशी
6 मार्चचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनलाभाचे संकेत, वाचा लकी राशी
Vastu Shashtra: मंडळींनो..तुम्ही पोळ्या मोजून बनवत असाल, तर सावधान! परिणाम जाणून व्हाल थक्क, वास्तुशास्त्र म्हणते...
मंडळींनो..तुम्ही पोळ्या मोजून बनवत असाल, तर सावधान! परिणाम जाणून व्हाल थक्क, वास्तुशास्त्र म्हणते...
March Month Born Zodiac Personality : मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव नेमका कसा असतो? वाचा लकी नंबर आणि स्वभाव वैशिष्ट्ये
मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव नेमका कसा असतो? वाचा लकी नंबर आणि स्वभाव वैशिष्ट्ये
Weekly Horoscope: मार्चचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ संकेत, 7 राशींची भरभराट, पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य
मार्चचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ संकेत, 7 राशींची भरभराट, पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर 
सोने चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Nitish Kumar: नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
Embed widget