Vastu Tips : श्रावणात 19 ऑगस्टपूर्वी 'या' गोष्टी घरात आणा; देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार प्रचंड वाढ
Shrawan Month Vastu Tips : श्रावणात भगवान शंकर आणि देवी पार्वतीसह देवी लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळतो. श्रावणाच्या काळात कोणत्या वस्तू घरी आणणं शुभ आहे ते जाणून घेऊयात.
Shrawan Month Vastu Tips : श्रावणाचा महिना येत्या 5 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. श्रावणात (Shrawan) सोमवारला विशेष महत्त्व आहे. भगवान शंकराला हा महिना समर्पित आहे. त्यामुळे हा महिना अत्यंत शुभ मानला जातो. त्याचप्रमाणे, श्रावणात काही वस्तू खरेदी करणं फार लाभदायक मानलं जातं. वास्तू शास्त्रानुसार, भगवान शंकराशी संबंधित काही वस्तू घरात आणल्याने सुख-समृद्धी येते असं म्हणतात.
श्रावणात भगवान शंकर आणि देवी पार्वतीसह देवी लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळतो. श्रावणाच्या काळात कोणत्या वस्तू घरी आणणं शुभ आहे ते जाणून घेऊयात.
1. रुद्राक्ष
श्रावणात भगवान शंकराला अत्यंत प्रिय असणारे असे रुद्राक्ष खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं म्हणतात की, श्रावणात रुद्राक्ष खरेदी केल्याने करिअरमध्ये प्रगती होते असं म्हणतात.
2. पारद शिवलिंग
श्रावण महिन्यात पारद शिवलिंग खरेदी करणं अत्यंत लाभदायक मानलं जातं. असं म्हणतात की, भगवान शंकराचा आशीर्वाद मिळाल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात.
3. त्रिशूल
भगवान शंकराला त्रिशूल अतिशय प्रिय आहे. त्यामुळे श्रावणात तुम्ही चांदी, तांबे किंवा सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. असं केल्याने आपली संकटांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे.
4. चांदीचा कडा
श्रावणात चांदीचा कडा खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं म्हणतात की असं केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो. तसेच, तुमच्या आयुष्यातील सर्व चिंता लवकरच मिटतील.
5. डमरु
देवांचा देव महादेव म्हटले जाणारे भगवान शंकराला डमरु अतिशय प्रिय आहे. श्रावणात डमरु खरेदी करणं अत्यंत लाभदायक मानलं जातं. मान्यतेनुसार, असं केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात. तसेच, आर्थिक तंगीपासून सुटका होते.
6. शमी वृक्ष
भगवान शंकराची पूजा केल्याने शमी वृक्षाचा प्रयोग करणं अत्यंत शुभ मानलं जातं. श्रावणात शमी वृक्ष खरेदी केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात असं म्हणतात. तसेच, शमी वृक्ष घरात आणल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते अशी मान्यता आहे. श्रावणात या वस्तू जर तुम्ही घरी आणल्या तर नक्कीच तुमच्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न होण्याची दाट शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )
हे ही वाचा :