Shani Dev : शनीचा लवकरच जुळून येणार राजयोग; ऑगस्ट महिन्यात 'या' 3 राशींना लागणार लॉटरी
Shani Dev : शनी मेष राशीच्या सप्तम चरणात असल्यामुळे या ठिकाणी नवम-पंचम राजयोग जुळून येणार आहे.
Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, शनी (Shani Dev) प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. तसं, पाहायला गेल्यास शनीला (Lord Shani) सर्वात अशुभ परिणाम देणारा ग्रह मानला जातो. पण, ऑगस्ट महिन्यात शनी काही राशीच्या लोकांना अतिशय शुभ परिणाम देणार आहे. या राशींमध्ये शनी काही राशीच्या लोकांना त्यांच्या कर्मानुसार शुभ फळ देणार आहे. ज्यामुळे तुमच्या करिअर, बिझनेस आणि लव्ह लाईफमध्ये चांगले परिणाम घडलेले दिसून येतील. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
शनी मेष राशीच्या सप्तम चरणात असल्यामुळे या ठिकाणी नवम-पंचम राजयोग जुळून येणार आहे. या राशीच्या लोकांना ऑगस्ट महिन्यात आपल्या मेहनतीला यश मिळेल. शनीचा स्वभाव कठोर आणि अनुशासन प्रिय आहे. त्यामुळे या महिन्यात तुम्हाला आळस त्याग करावा लागेल. तसेच, तुमची लाईफस्टाईल सुधारावी लागेल. अन्यथा, तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
जर तुमच्या विवाहात कोणते अडथळे येत असतील तर त्या दूर होतील. या आठवड्यात तुम्हाला स्वत:ला सिद्ध करावं लागेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या सप्तम चरणाचा स्वामी शनि अष्टम चरणात स्वगृही होऊन संक्रमण करणार आहे. यामुळे ऑगस्टचा महिना तुमच्यासाठी विशेष असणार आहे. तसेच, जे लोक मिडिया, सेल्स एन्ड सर्विस, वेबसाईट डिझायनिंग सारख्या फिल्डशी संबंधित असाल तर शनी तुम्हाला शुभ परिणाम देणार आहे. ऑगस्ट महिन्यात जर तुम्हाला लाभ हवा असेल तर तुम्हाला तुमच्यातला आळस दूर करावा लागेल.
तसेच, ज्या लोकांनी नुकताच स्टार्टअप सुरु केला आहे अशा लोकांना देखील शनी शुभ फळ देणार आहे. पण, तुम्हाला वेळेचं भान ठेवून काम करावं लागेल. तसेच, शनीला खोटं बोलणारे लोक आवडत नाहीत. त्यामुळे आपल्या म्हणण्यावर ठाम राहा.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या दशम चरणात शनी शश योग आणणार असल्यामुळे अत्यंत शुभ परिणाम मिळणार आहे. शनीची तूळ रास ही अत्यंत प्रिय रास आहे. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांना या काळात घाबरण्याची गरज नाही. तसेच, जे लोक रोजगाराच्या शोधात आहेत त्यांना ऑगस्ट महिन्यात शुभवार्ता मिळेल. तुम्हाला प्रमोशनची संधी मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )
हे ही वाचा :