Shravan 2024 : आज श्रावणातील दुसरा सोमवार; महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी?
Shravan 2024 : आज श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाला शिवामूठ वाहिली जाते. दुसऱ्या सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ वाहिली जाणार? जाणून घेऊया.

Shravan 2024 : श्रावण (Shravan 2024) महिन्यात अनेक व्रत वैकल्य असतात. यंदा श्रावणात 5 सोमवार असल्याने या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला शिवमूठ (Shiva Muth) वाहिली जाते. प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्याची शिवमूठ महादेवाला अर्पण केली जाते. त्यानुसार 12 ऑगस्टला आलेल्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवमूठ अर्पण करावी? जाणून घेऊया.
दुसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ? (Shravan 2024 Second Shiva Muth)
श्रावण महिन्यात दर सोमवारी शंकराला शिवामूठ वाहली जाते, त्याप्रमाणे शंकराला दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ (Til Shiva Muth) वाहायची आहे.
यंदा श्रावणात किती सोमवार आणि कोणती शिवमूठ वाहावी?
पहिला सोमवार – 05 ऑगस्ट, पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ वाहावी.
दुसरा सोमवार – 12 ऑगस्ट, दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ वाहावी.
तिसरा सोमवार – 19 ऑगस्ट, तिसऱ्या सोमवारी शिवामूठ मूग वाहावी.
चौथा सोमवार – 26 ऑगस्ट, चौथ्या सोमवारी शिवामूठ जव वाहावी.
पाचवा सोमवार – 02 सप्टेंबर, पाचव्या सोमवारी शिवामूठ हरभरा वाहावी.
श्रावणी सोमवारी शंकराच्या आराधनेसाठी त्याला बेल, दूध अर्पण केलं जातं आणि त्यानंतर शिवमूठ अर्पण केली जाते. प्रत्येक सोमवारी एक वेगळी शिवमूठ असते.
शंकराची पूजा कशी करावी?
प्रत्येकाने आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शंकराच्या फोटोची पूजा करावी. शंकराचा फोटोसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचं किंवा शिवाचं चित्र काढून त्याची पूजा करावी. ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकता.
शिवामूठ व्रत करण्याची पद्धत
विवाहानंतर पहिली पाच वर्षं श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केलं जातं. श्रावण मासात येणार्या चार/पाच सोमवारी चार/पाच प्रकारचं धान्य शिवाला अर्पण केलं जातं. विवाहानंतरची पहिली पाच वर्षं क्रमवार हे व्रत केलं जातं.
श्रावण मासात कोणकोणते सण-व्रत साजरे केले जाणार?
या पवित्र मासात श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर पूजन, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, शुक्रवारचं व्रत, अशी अनेक व्रतं केली जातात. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी ‘श्रावणी सोमवार’ हे व्रत केलं जातं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
