एक्स्प्लोर

Shravan 2024 : आज श्रावणातील चौथा सोमवार; महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी?

Shravan 2024 : आज श्रावण महिन्याचा चौथा सोमवार आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाला शिवामूठ वाहिली जाते. आज चौथ्या सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ वाहिली जाणार? जाणून घेऊया.

Shravan 2024 : श्रावण (Shravan 2024) महिन्यात अनेक व्रत वैकल्य असतात. यंदा श्रावणात 5 सोमवार असल्याने या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला शिवमूठ (Shiva Muth) वाहिली जाते. प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्याची शिवमूठ महादेवाला अर्पण केली जाते. त्यानुसार आज 26 ऑगस्टला आलेल्या चौथ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करावी? जाणून घेऊया.

चौथ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ? (Shravan 2024 Fourth Shiva Muth)

श्रावण महिन्यात दर सोमवारी शंकराला शिवामूठ वाहली जाते, त्याप्रमाणे शंकराला चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ (Barley Shiva Muth) म्हणून जव वाहायचं आहे.

यंदा श्रावणात किती सोमवार आणि कोणती शिवमूठ वाहावी?

पहिला सोमवार – 05 ऑगस्ट, पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ वाहावी.
दुसरा सोमवार – 12 ऑगस्ट, दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ वाहावी.
तिसरा सोमवार – 19 ऑगस्ट, तिसऱ्या सोमवारी शिवामूठ मूग वाहावी.
चौथा सोमवार – 26 ऑगस्ट, चौथ्या सोमवारी शिवामूठ जव वाहावी.
पाचवा सोमवार – 02 सप्टेंबर, पाचव्या सोमवारी शिवामूठ हरभरा वाहावी.

श्रावणी सोमवारी शंकराच्या आराधनेसाठी त्याला बेल, दूध अर्पण केलं जातं आणि त्यानंतर शिवमूठ अर्पण केली जाते. प्रत्येक सोमवारी एक वेगळी शिवमूठ असते.

शंकराची पूजा कशी करावी?

प्रत्येकाने आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शंकराच्या फोटोची पूजा करावी. शंकराचा फोटोसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचं किंवा शिवाचं चित्र काढून त्याची पूजा करावी. ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकता.

शिवामूठ व्रत करण्याची पद्धत

विवाहानंतर पहिली पाच वर्षं श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केलं जातं. श्रावण मासात येणार्‍या चार/पाच सोमवारी चार/पाच प्रकारचं धान्य शिवाला अर्पण केलं जातं. विवाहानंतरची पहिली पाच वर्षं क्रमवार हे व्रत केलं जातं.

श्रावण मासात कोणकोणते सण-व्रत साजरे केले जाणार?

या पवित्र मासात श्रावणी सोमवार, मंगळागौर पूजन, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, शुक्रवारचं व्रत, अशी अनेक व्रतं केली जातात. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी ‘श्रावणी सोमवार’ हे व्रत केलं जातं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shravan 2024 : तब्बल 71 वर्षांनंतर यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून; 'या' 4 राशींचं नशीब पालटणार, महादेवाच्या कृपेने होणार अपार धनलाभ

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 : श्रावणात 'या' राशींवर असणार महादेवाची विशेष कृपा; भोलेनाथाच्या आशीर्वादाने सुख-संपत्तीत होणार भरभराट, तुमची रास यात आहे का?
श्रावणात 'या' राशींवर असणार महादेवाची विशेष कृपा; भोलेनाथाच्या आशीर्वादाने सुख-संपत्तीत होणार भरभराट, तुमची रास यात आहे का?
Garud Puran: विवाह हा योगायोग नाही, तर तो तुमच्या कर्माचा एक भाग? विवाह आणि कर्मांचा संबंध काय? गरूडपुराणातील हा उल्लेख जाणून व्हाल थक्क
विवाह हा योगायोग नाही, तर तो तुमच्या कर्माचा एक भाग? विवाह आणि कर्मांचा संबंध काय? गरूडपुराणातील हा उल्लेख जाणून व्हाल थक्क
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! आजपासून ऑगस्टचा दुसरा आठवडा, आयुष्यात मोठा यु-टर्न, पैसा, नोकरीत बदल.. साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! आजपासून ऑगस्टचा दुसरा आठवडा, आयुष्यात मोठा यु-टर्न, पैसा, नोकरीत बदल.. साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 10 August 2026 : आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा; 'या' राशींना सावधगिरीचा इशारा; वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा; 'या' राशींना सावधगिरीचा इशारा; वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget