Shravan 2024 : तब्बल 71 वर्षांनंतर श्रावणाची सुरुवात आणि शेवट सोमवारीच; 4 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, महादेवाच्या कृपेने होणार अपार धनलाभ
Shravan 2024 : यंदा श्रावणाची सुरुवात ही सोमवारपासून झाली आणि शेवट देखील सोमवारीच होत असल्याने यंदाच्या श्रावणाला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. महिना काही राशींसाठी अत्यंत लाभदायक जाऊ शकतो. शुभ योग जुळून आल्याने त्यांना धनलाभ होण्याची शक्यता आहे.
Shravan Somvar : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि त्यात श्रावणाची सुरुवात सोमवारपासून आली तर तो काळ अधिक महत्त्वाचा ठरतो. 1953 मध्ये शेवटच्या वेळी श्रावणाची सुरुवात सोमवारच्या (Shravani Somvar 2024) दिवशी झाली होती. यानंतर यंदा तब्बल 71 वर्षांनंतर श्रावणाची सुरुवात आणि शेवट सोमवारी होत आहे.
या काळात मेष राशीसह 4 राशींना महादेवाची विशेष कृपा लाभेल आणि त्यांचं पुढचं जीवन देखील सुकर होईल. येत्या काळात 4 राशींच्या जीवनाला कलाटणी मिळेल, परंतु या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
'या' राशींचं भाग्य उजळणार
मेष रास (Aries)
श्रावणाची सांगता झाली असून मेष राशीच्या लोकांसाठी पुढचा काळ शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात तुम्ही कामाच्या ठिकाणी मोठं यश प्राप्त कराल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता असून या कालावधीत तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला शंकराची कृपा दुपटीने लाभू शकते. तुमची रखडलेली कामं मार्गी लागतील. तसेच नोकरीच्या नव्या संधीही या काळात उपलब्ध होऊ शकतात.
सिंह रास (Leo)
सिंह राशीसाठी येता काळ शुभ ठरू शकतो. कामात उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा असणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. राजकारणाशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. तुम्हाला एखादं पद देखील मिळू शकतं.
धनु रास (Sagittarius)
श्रावण महिन्यात लाभलेल्या कृपेमुळे तुमचे पुढचे दिवस आनंदाचे असतील. येता काळ धनु राशीच्या लोकांसाठी प्रचंड धनलाभ घेऊन येणारा ठरु शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळात नवीन नोकरी मिळू शकते. तसेच नवीन व्यवसाय सुरू करणंही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. या काळात गुंतवणूक केली तर या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांना शंकराच्या कृपने सुखाचे दिवस येऊ शकतात. या लोकांना पैसे कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळू शकतात. याशिवाय या लोकांना व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना मेहनतीचं उत्तम फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. प्रेम संबंध चांगले राहतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :