(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivrajyabhishek Din 2024 Wishes : शिवराज्याभिषेक दिनाच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; शिवरायांचा आठवा प्रताप, पाठवा 'हे' मेसेज
Shivrajyabhishek Din 2024 Wishes : शिवप्रेमींसाठी 6 जूनचा दिवस म्हणजे सणाप्रमाणेच. 350 वर्षांपूर्वी याच दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला, तेव्हापासून हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना हे काही प्रेरणादायी शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
Shivrajyabhishek Din 2024 Wishes In Marathi : छत्रपती शिवराय म्हणजे महाराष्ट्राचं महान दैवत, महान राजे. 350 वर्षांपूर्वी 6 जून 1674 रोजी त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. शिवरायांनी मराठी साम्राज्याचा पाया रोवला, म्हणून रायगडमध्ये त्यांचा राज्याभिषेक करुन त्यांना छत्रपती ही पदवी बहाल करण्यात आली. दरवर्षी या दिवशी रायगडावर (Raigad) शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Sohala 2024) मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या दिवसानिमित्त तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना हे काही प्रेरणादायी शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
शिवराज्याभिषेक दिन शुभेच्छा संदेश (Shivrajyabhishek Din Wishes In Marathi)
रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस
मुघलांना वाटत होती ज्यांची भीती
असे आमचे शिवाजी राजे झाले आज ‘छत्रपती’
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी…
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
असा आमचा “राजा शिवछत्रपती”
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
श्वासात राजं ध्यासात राजं
रणी धाव मार्तंड
चंड तू प्रचंड धाव
साहुनीया तांडव हे
कर तू धुंद शंकरा
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याला कुठेही गालबोट लागू न देता सर्वांना हा उत्साह साजरा करता यासाठी खूप खूप शुभेच्छा!
डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच,
आजही वाजतोय जगती,
राखले स्वराज्य अबाधीत,
असे हे एकमेव शिवछत्रपती..
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!
भरली इतिहासालाही धडकी
मातीत घडलं असं धाडसं,
दगड-धोंड्यांच्या स्वराज्यात
माझ्या राजाच सोन्याचं
सिंहासन सजलं
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
निश्चयाचा महामेरु,
बहुत जनांसी आधारु,
अखंड स्थितीचा निर्धारु
।। श्रीमंतयोगी।।
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!
सह्याद्रीच्या रांगांवरती,
सदा मुघलांच्या नजरा,
बोटं छाटली तयांची,
त्या शिवबांना माझा मुजरा..
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,
कुशल प्रशासनकर्ते
छत्रपती श्रीशिवाजी महाराज
यांना 'राज्यभिषेक दिनी' मानाचा मुजरा!
शिवराज्याभिषेक सोहळा शुभेच्छा संदेश (Shivrajyabhishek Sohala Wishes In Marathi)
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा!!!
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा!
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
माझ्या राजाला दगडाच्या मंदिराची गरज नाही,
माझ्या राजाला रोज पुजावं लागत नाही,
माझ्या राजाला दूध-तुपाचा अभिषेक करावा लागत नाही,
माझ्या राजाला कधी नवस बोलावा लागत नाही,
माझ्या राजाला सोने-चांदीचा साज ही चढवावा लागत नाही,
एवढ असुनही जे जगातील अब्जवधी लोकांच्या
हृदयावर अधिराज्य गाजवतात असे एकमेव युगपुरुष..
‘छत्रपती शिवाजी महाराज’
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!
झाला तुझ्या चरणी अख्खा
महाराष्ट्र गोळा
थाटला हिंदवी स्वराज्याचा
श्री शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शुभेच्छा!
हेही वाचा:
Shani Jayanti 2024 Date : शनी जयंती अवघ्या एका दिवसावर; जाणून घ्या तारीख, मुहूर्त, महत्त्व आणि उपाय