एक्स्प्लोर

Shani Vakri 2024 : जूनमध्ये शनि वक्रीमुळे 'या' 4 राशींना बसणार फटका; पाण्यासारखा पैसा वाया जाणार, सर्वच कामात येणार अडथळे

Shani Vakri 2024 : शनि वक्रीमुळे कुंभ राशीसह 4 राशींचा वाईट काळ सुरू होणार आहे. जूनमध्ये शनि वक्री होईल आणि तेव्हापासून तुमच्या प्रत्येक कामात अडथळे येण्यास सुरुवात होईल, नोकरी-व्यवसायाशी संबंधित निर्णय तुम्हाला जपून घ्यावे लागतील.

Shani Vakri 2024 : ज्योतिषशास्त्रात शनीला (Shani) विशेष महत्त्व आहे. शनिदेवाला न्याय देवता म्हटलं जातं, तो व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. जेव्हा जेव्हा शनि एखाद्या राशीत वक्री होतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, सध्या शनि कुंभ राशीत विराजमान असून 29 जूनला याच राशीत शनि वक्री (Shani Vakri) होईल. शनीची ही स्थिती 15 नोव्हेंबरपर्यंत कायम राहील.

शनीच्या वक्री (Shani Vakri 2024) स्थितीमुळे काही राशीच्या लोकांना शुभ, तर काहींना अशुभ परिणाम पाहायला मिळतील. मेष आणि वृषभसह 4 राशींच्या लोकांसाठी शनि वक्री अशुभ ठरेल. या राशींना या काळात अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. आर्थिक समस्यांसोबतच आरोग्याशी संबंधित समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. नोकरी-व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शनि वक्री काळात 4 राशींच्या लोकांना सावध राहावं लागणार आहे,   या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

शनि वक्रीचा 'या' 4 राशींना बसणार फटका

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांना शनीच्या वक्री चालीमुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चढ-उतार होऊ शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात सावध राहावं लागेल, वादापासून दूर राहावं लागेल, अन्यथा खटके उडू शकतात. तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर या काळात तुम्हाला अडथळ्यांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात तुमचं आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता आहे.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांवर शनीच्या वक्री चालीचा परिणाम होईल. कामाच्या ठिकाणी सर्वाधिक प्रभाव दिसून येईल. या काळात व्यापाऱ्यांना व्यवसायात नुकसानही सहन करावं लागू शकतं. तसेच, नोकरदार लोकांना ऑफिसमध्ये आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. तुम्ही या काळात चुकूनही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू नका, अन्यथा काही मोठ्या समस्या उद्भवतील. या काळात नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर थांबा, कारण हे तुम्हाला महागात पडू शकतं.

मकर रास (Capricorn)

शनीची वक्री स्थिती मकर राशीच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. या काळात तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. आरोग्याबाबत तुम्ही सावधगिरी बाळगा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आपलं आरोग्य बिघडू शकतं. यावेळी तुम्हाला संयम बाळगण्याची गरज आहे. शनीचा अशुभ प्रभाव वाढल्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या 4 महिन्यांच्या काळात कुणाशीही पैशाचा व्यवहार करू नका.

कुंभ रास (Aquarius)

वक्री शनि कुंभ राशीच्या लोकांसाठी अशुभ परिणाम घेऊन आला आहे. या काळात तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. तुमचं पूर्ण होत आलेलं काम अगदी शेवटच्या क्षणी बिघडू शकतं, त्यामुळे या काळात अत्यंत सावधगिरीने काम करा. कामाच्या ठिकाणी रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुम्हाला तुमची नोकरी गमवावी लागू शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Shani Dev : शनीची उलटी चाल 'या' राशींवर पडणार भारी; अडीच महिने प्रत्येक कामात येणार अडथळे, जोडीदारासोबत उडतील खटके

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 18 August 2026: आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Hindu Religion: ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
Shravan 2026: सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget