(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Vakri 2024 : अवघ्या 6 दिवसांत शनीची वक्री; 'या' राशींचं नशीब 360° फिरणार, हाती येणार अपार पैसा, नोकरी-व्यवसायात प्रगती
Shani Vakri 2024 : कोणत्याही ग्रहाची जेव्हा उलटी चाल सुरु होते तेव्हा अनेक राशींवर त्याचा अशुभ परिणाम होतो, पण हा काळा काही राशींसाठी नशीब पालटणारा ठरतो. 30 जूनला शनि वक्री होईल, त्यानंतर 3 राशींचं भाग्य उजळेल.
Shani Dev 2024 : ज्योतिषशास्त्रात शनीला (Shani) विशेष महत्त्व आहे. शनि ठराविक काळानंतर आपली चाल बदलतो. कधी तो सरळ चाल चालतो, तर कधी उलटी-म्हणजेच वक्री. शनीच्या चालीचा परिणाम मानवी जीवनासह संपूर्ण जगावर दिसून येतो. यातच आता 30 जूनला शनि वक्री होणार आहे, म्हणजेच तो आता उलटी चाल चालेल.
शनि तब्बल 30 वर्षांनंतर कुंभ राशीत वक्री होणार आहे, त्यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं. तसेच नोकरी आणि व्यवसायात त्यांची मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. शनि वक्रीमुळे नेमक्या कोणत्या राशींचं भाग्य उजळणार? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
शनीची वक्री चाल मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि लाभाच्या घरात वक्री होणार आहेत, त्यामुळे या काळात तुमचं उत्पन्न प्रचंड वाढू शकतं. तसेच, या काळात तुम्हाला तुमच्या व्यावसायिक कामात काही अडथळे येत असतील तर ते देखील दूर होतील. या काळात तुम्हाला गुंतवणुकीतून लाभ मिळेल. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर या काळात ते परत मिळण्याची शक्यता आहे. तसेच, यावेळी तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होऊ शकतात. वेळी नोकरदार लोकांना करिअरमध्ये प्रगतीसाठी सुवर्ण संधी मिळतील.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री शुभ सिद्ध होऊ शकते. या काळात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली नोकरी मिळू शकते. तसेच नोकरदार लोकांना आणि व्यावसायिकांना चांगले फायदे मिळतील आणि तुमच्या करिअरमध्ये तुम्ही नवीन उंची गाठाल. यावेळी, व्यावसायिक लोक त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करू शकतात, व्यवसायातून तुम्हाला बक्कळ पैसा मिळेल. तुमच्या वडिलांसोबतचं तुमचं नातं अधिक घट्ट होईल.
कुंभ रास (Aquarius)
शनीची उलटी चाल कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमची जीवनशैली सुधारेल. तुमचं व्यक्तिमत्वही सुधारेल. तुमच्या नेतृत्व क्षमतेत मोठी वाढ होईल आणि तुमची कीर्ती वाढेल. तसेच, या काळात तुमचं तुमच्या जोडीदारासोबतचं नातं अधिक घट्ट होईल. तुमच्या जोडीदाराची देखील या काळात चांगली प्रगती होईल. तसेच या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामात फायदा होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: