Shani Trayodashi 2024 : शनि त्रयोदशी कधी आहे? शनिदेवाची सदैव कृपा राहावी यासाठी 'हे' सोपे उपाय करा
Shani Trayodashi 2024 : शनिचं सध्या कुंभ राशीत भ्रमण सुरु आहे. यानंतर शनिवारी 6 एप्रिल रोजी दुपारी 03.55 वाजता शनि पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
Shani Trayodashi 2024 : ज्योतिषशास्त्रात शनि देवाचं (Shani Dev) फार महत्त्व आहे. त्यातही तब्बल 30 वर्षांनंतर शनिचं नक्षत्रात (Shani Nakshatra) परिवर्तन होणार आहे. त्यामुळे ते फार खास असणार आहे. तसेच 2024 या वर्षात तीन वेळा शनिचं नक्षत्रात परिवर्तन होणार आहे. सर्वात पहिलं परिवर्तन 6 एप्रिल 2024 रोजी पूर्व भाद्रपद नक्षत्रात (Purva Bhadrapad Nakshatra) ग्रहांचं परिवर्तन होणार आहे. शनिवारी शनिचं हे नक्षत्र परिवर्तन गुरु नक्षत्रात होणार आहे.
'या' लोकांसाठी शनि त्रयोदशीचा दिवस खास
शनिचं सध्या कुंभ राशीत भ्रमण सुरु आहे. यानंतर शनिवारी 6 एप्रिल रोजी दुपारी 03.55 वाजता शनि पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. याचाच परिणाम सर्व राशींवर होणार आहे. तुमच्यावर देखील शनि देवाची कृपा राहावी असं वाटत असेल तर शनि प्रदोषचा दिवस फार शुभ मानला जातो. त्यामुळे ज्या लोकांवर सध्या शनिची साडेसाती सुरु आहे अशा लोकांसाठी शनि त्रयोदशीचा दिवस फार खास मानला जातो. जर त्रयोदशी तिथी शनिवारी असेल तर त्यास शनि प्रदोष म्हणतात.
शनि त्रयोदशीच्या दिवशी शनि देवाची जर तुमच्यावर कृपा राहावी असं वाटत असेल तर तुम्ही त्याची पूजा करू शकता. या प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळच्या वेळी शिवलिंगाची पूजा करावी. शनि प्रदोषच्या दिवशी भगवान शंकराच्या पूजेबरोबरच शनिदेवाच्या पूजेचं देखील फार महत्त्व आहे.
शनि त्रयोदशीच्या दिवशी 'हे' खास उपाय करा
- शनि त्रयोदशीच्या दिवशी देवावर काळे तीळ, निळं वस्त्र किंवा मोहरीचं तेल चढवणं फार शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्हीदेखील हा उपाय करू शकता.
- जर तुमच्यावर शनिची साडेसाती सुरु आहे तर तुम्ही नक्की शनि प्रदोष व्रत करावे. यामुळे साडेसातीचा प्रभाव कमी होईल.
- शनि त्रयोदशीच्या दिवशी हनुमान चालिसाचं पठण करा. शनिदेवाची कृपा भगवान हनुमानाच्या भक्तांवर सदैव असते.
- शनि त्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली नक्की लावा. असे केल्याने शनिदेव सदैव प्रसन्न असतील.
- शनि त्रयोदशीच्या दिवशी गरजूंची मदत करा. भोजन, वस्त्र, अन्न इ. गोष्टी दानदेखील करू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :