Shani- Shukra Yog : शनी-शुक्राच्या युतीने जुळून येतोय अर्धकेंद्र योग; 5 डिसेंबरपासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरु
Shani- Shukra Yog : द्रिक पंचांगानुसार, 5 डिसेंबर रोदी शुक्र आणि शनी संध्याकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी अर्धकेंद्र योग जुळून येणार आहे. हा योग फार शुभ मानला जातो.
Shani- Shukra Yog : वैदिक ज्योतिष शास्त्रात, कर्मफळदात शनी (Shani Dev) आणि शुक्र ग्रहाला फार महत्त्व आहे. शनीला (Lord Shani) सर्वात क्रूर ग्रह मानले जाते. कारण शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. तर, शुक्र ग्रह हा सुख-समृद्धी आणि धनसंपत्ती, मान-सन्मानाचा कारक ग्रह मानला जातो. शुक्र-शनी हे एकमेकांचे मित्र ग्रह आहेत.
सध्या शनी आपल्या मूळ राशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. तर, शुक्र ग्रह मीन राशीत विराजमान आहे. यामुळे अर्धकेंद्र योग जुळून आला आहे. यामुळे अनेक राशींना लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
द्रिक पंचांगानुसार, 5 डिसेंबर रोदी शुक्र आणि शनी संध्याकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी अर्धकेंद्र योग जुळून येणार आहे. हा योग फार शुभ मानला जातो.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या शुक्र दहाव्या चरणात आणि शनी अकराव्या चरणात विराजमान आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तसेच, तुम्हाला धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. या काळात तुम्ही धार्मिक यात्रेला देखील जाऊ शकता.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी अर्धकेंद्र योय फार शुभ असणार आहे. या राशीच्या लोकांना प्रगतीच्या अनेक संधी आहेत. या संधीचा तुम्ही लाभ घ्यावा.तसेच, कामाच्या ठिकाणी देखील तुमचा दिवस चांगला जाणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. व्यवसायात देखील तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांना शनी आणि शुक्र ग्रहाच्या कृपेने विशेष लाभ मिळणार आहे. तुम्हाला जर लोन घ्यायचं असेल तर तुम्ही आज घेऊ शकता. तसेच, शुक्र ग्रहामुळे तुम्ही या काळात चांगली भ्रमंती करु शकता. तुम्हाला तुमच्या पार्टनरचा चांगला सपोर्ट मिळेल. तुमचा व्यवसाय देखील चांगला सुरळीत चालेल. तुमच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :