(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani 2024 : तीन महिन्यांनंतर शनिदेव नक्षत्र बदलणार; 'या' 4 राशींना होणार मोठा फायदा
Shani Dev Nakshatra Parivartan : शनि अशुभ असल्यास व्यक्तीच्या जीवनात बऱ्याच समस्या येतात, त्याच प्रमाणे शनीच्या शुभ असण्याने जीवन सुखांनी भरतं, जीवन सुकर होत. सध्या शनिदेव शतभिषा नक्षत्रात आहे.
Shani 2024 : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाचे (Shani Dev) विशेष स्थान आहे. शनिदेवाला पापी ग्रह म्हणतात. शनीच्या अशुभ परिणामांची भीती सर्वांनाच असते. जेव्हा शनि अशुभ असतो तेव्हा माणसाला जीवनात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं, तर शनि शुभ असेल तेव्हा जीवन आनंदी होतं. यावेळी शनिदेव शतभिषा नक्षत्रात आहेत. शनिदेव तीन महिन्यांनी पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. शनिदेवाने नक्षत्र बदलताच काही राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. शनीच्या नक्षत्र बदलामुळे कोणत्या राशींना मोठा फायदा होईल हे जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचे तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. आर्थिक लाभ होईल. अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचीही शक्यता आहे. कामात यश मिळेल.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी देखील शनीचं नक्षत्र परिवर्तन लाभदायी ठरणार आहे. या काळात वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानाचा आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. सर्व ठिकाणी तुम्हाला खूप सन्मान मिळेल. पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.
कन्या रास (Virgo)
शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे कन्या राशीच्या लोकांना चांगले दिवस येतील. कामाच्या ठिकाणी काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. महिन्याच्या शेवटी तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कामात यश मिळेल.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीसाठी देखील शनीचं नक्षत्र परिवर्तन शुभ वार्ता घेऊन येणार आहे. नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ शुभ राहील. वैवाहिक जीवनात आनंद येईल. आर्थिक लाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरीत नवीन संधी मिळतील. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: