Shani Nakshatra Parivartan : शनीचं होणार नक्षत्र परिवर्तन; 27 डिसेंबरपासून 'या' 3 राशींची होणार चांदी , नवीन वर्षात जगतील राजासारखं आयुष्य
Shani Nakshatra Parivartan 2024 : वर्षाच्या शेवटी अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहेत. यामध्येच, कर्मफळदाता शनी 27 डिसेंबरला पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
Shani Nakshatra Parivartan 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्षाची सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. 2024 च्या शेवटी अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहेत. यामध्येच, कर्मफळदाता शनी (Shani Dev) 27 डिसेंबरला पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, शनी कोणत्याही राशीत तब्बल अडीच वर्षांपर्यंत असतो. शनीच्या धिम्या गतीचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम होतो. तर, जेव्हा शनी नक्षत्र बदलतात तेव्हा काही राशींच्या जीवनात आनंद येतो. तर, काही राशींना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. 27 डिसेंबरला होणाऱ्या नक्षत्र परिवर्तनाचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी शनीचा हा बदल फार चांगला असणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांना चांगलं प्रमोशन मिळू शकतं. तसेच, ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. जे लोक बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरी मिळू शकते. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. तसेच, तुमच्या आरोग्यात सुधारणा पाहायला मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन फार शुभकारक असणार आहे. हा काळ तुमच्या करिअर आणि अभ्यासासाठी फार चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, पैशांशी संबंधित तुमच्या सर्व समस्या दूर होतील. जोडीदाराचा चांगला पाठिंबा मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन फार सकारात्मक असणार आहे. या काळात तुमचा तणाव संपेल. आणि तुम्ही आनंदी असाल. तुमचं जे काम अनेक दिवसांपासून रखडलेलं आहे ते पूर्ण होईल. तसेच, तुम्ही गुंतवून ठेवलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला नफा मिळेल. तसेच, मित्रांच्या सहकार्याने तुमची सर्व कामे सुरळीतपणे पार पडतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: