Shani Nakshatra Gochar : नवीन वर्षात शनीचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 5 राशींना वर्षभर मिळणार चिक्कार लाभ, शनीदेवाची विशेष कृपा
Shani Nakshatra Gochar : शनीने देवगुरु बृहस्पतीच्या पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे. वर्षाच्या शेवटी शनीने नक्षत्र परिवर्तन केल्यामुळे नवीन वर्षात काही राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे.
Shani Nakshatra Gochar : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नुकतंच शनीचं (Shani Dev) नक्षत्र परिवर्तन झालं आहे. शनीने (Lord Shani) देवगुरु बृहस्पतीच्या पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे. वर्षाच्या शेवटी शनीने नक्षत्र परिवर्तन केल्यामुळे नवीन वर्षात काही राशींचं (Zodiac Signs) भाग्य उजळण्याची शक्यता आहे.
ज्योतिष शास्त्रात शनीला न्यायदेवता म्हणतात. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तर संपूर्ण राशीचक्र संक्रमण करण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी लागतो. शनीच्या पूर्वा भाद्रपद नक्षत्राचा कोणत्या राशीवर कसा परिणाम होतो ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
शनीचं नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या एकादश चरणात आहे. तर, बृहस्पती दुसऱ्या चरणात आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला धन-संपत्तीचा लाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तसेच, विद्यार्थ्यांसाठी हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने वृषभ राशीच्या लोकांना चांगला लाभ होऊ शकतो. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला चांगली नोकरी मिळेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी शनीच्या नक्षत्राचा चांगाला परिणाम होणार आहे. या काळात तुमची सामाजिक कार्यात रुची वाढेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. या काळात तुमचे प्रेमसंबंध मजबूत होतील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन फार लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या शनी पंचम चरणात आहे तर बृहस्पती आठव्या चरणात आहे. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या चौथ्या चरणात शनीचं नक्षत्र परिवर्तन झालं आहे. तर, बृहस्पती सातव्या चरणात आहे. भौतिक सुख सुविधांचा लाभ मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. जर तुम्ही ट्रेंडिंगमध्ये काम करत असाल तर तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
कुंभ रास (Aquarius Hoeoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. या काळात तुमचे प्रेमसंबंध चांगले असतील. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: