Shani Margi 2025 : नवीन वर्षात 'या' राशींना अडचणीत टाकणार शनीदेव; अग्रीपरीक्षेचा काळ, कोणकोणत्या राशीच्या लोकांना फटका बसणार
Shani Margi 2025 : नवीन वर्षात सिंह, धनुसह या 5 राशींची शनि अग्निपरीक्षा घेणार आहेत. या राशींच्या करिअरवर तसेच, कुटुंबावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Shani Margi 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार,न्यायदेवता शनि (Shani Dev) मीन राशीत मार्गी होणार आहे. 28 नोव्हेंबरपासून शनि मीन राशीत मार्गी (Shani Margi) चाल म्हणजेच सरळ चाल चालणार आहेत. तर, 2026 मध्येसुद्धा वक्री मार्गी होऊन शनिचा मीन राशीत प्रवेश होणार आहे. मान्यतेनुसार, नवीन वर्षात सिंह, धनुसह या 5 राशींची शनि अग्निपरीक्षा घेणार आहेत. या राशींच्या करिअरवर तसेच, कुटुंबावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
सिंह रास (Leo Horoscope)
नवीन वर्षात सिंह राशीवर शनिची ढैय्या असणार आहे. त्याचबरोबर या राशीवर शनीचा सर्वात कठीण काळ सुरु राहणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नाचे मार्ग फार कमी झालेले दिसतील. तसेच, मानसिक ताण जाणवेल. कुटुंबात देखील तणावाचं वातावरण पाहायला मिळेल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
नवीन वर्षात शनीच्या मार्गी चालीचा धनु राशीवर अशुभ परिणाम पाहायला मिळणार आहे. सध्या धनु राशीवर ढैय्याचा प्रभाव आहे. त्यामुळे नवीन वर्षात पैशांच्या बाबतीत तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. खर्चात वाढ होऊ शकते. त्यामुळे पैशांचा जपून वापर करा. रागावर नियंत्रण ठेवा.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीवर शनिच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. तसेच, राहू लग्न भावात विराजमान असल्याने तुम्हाला फार संघर्ष करावा लागणार आहे. तुमच्या वैयक्तिक आयुष्यासह तुमच्या व्यवसायावरही परिणाम झालेला दिसेल. कामात दिरंगाई झाल्यामुळे तुमची अनेक कामे बिघडलेली दिसतील.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीवर शनिच्या साडेसातीचा मधला टप्पा सुरु आहे. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात देखील तुम्हाला सावधान राहण्याची गरज आहे. या काळात कोणताही निर्णय घेताना नीट विचारपूर्वक तसेच, कुटुंबियांचं मत विचारात घेऊन करा. कोणाच्या अध्यात मध्यात पडू नका. तुमच्ा कामावर लक्ष केंद्रित करा.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी येणारं नवीन वर्ष उत्सुकतेचं त्याचबरोबर धोक्याचं असणार आहे. या काळात शनिच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु असल्या कारणाने तुम्हाला वेळोवेळी सावध राहावं लागेल. त्यासाठी कोणतंही कार्य हाती घेताना नीट मन लावून करा. कोणत्याही कामात शॉर्टकट वापरु नका.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















