Shani Margi 2024 : दिवाळीनंतर शनीची मार्गी चाल, 'या' राशींचा वाईट काळ लवकरच होणार सुरु; धनहानीचा करावा लागणार सामना
Shani Margi 2024 : शनी हा सर्वात धिम्या गतीने चालणारा ग्रह मानला जातो. शनीच्या कुंभ राशीत मार्गी झाल्याने काही राशीच्या लोकांसाठी हा काळ फार आव्हानात्मक ठरु शकतो.
Shani Margi 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनी (Lord Shani) 15 नोव्हेंबर रोजी आपल्या मूळ राशीत म्हणजेच कुंभ राशीत मार्गी होणार आहे. शनीच्या (Shani Dev) सरळ चालीन काही राशीच्या लोकांना याचा विशेष लाभ मिळणार आहे. तर काही राशींनी या काळात सांभाळून राहण्याची गरज आहे. शनी प्रत्येक राशीला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधीना कधी शनीची ढैय्या, साडेसाती आणि महादशेचा सामना करावा लागतो.
शनी हा सर्वात धिम्या गतीने चालणारा ग्रह मानला जातो. शनीच्या कुंभ राशीत मार्गी झाल्याने काही राशीच्या लोकांसाठी हा काळ फार आव्हानात्मक ठरु शकतो. या राशी (Zodiac Signs) कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
सिंह रास (Leo Horoscope)
शनी या राशीच्या सातव्या चरणात मार्गी होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना संकटांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या मित्राबरोबर तुमचे वादविवाद होऊ शकतात. तसेच, जर तुम्ही व्यवहार करत असाल तर तुम्हाला थोडी खबरदारी घेण्याची गरज आहे. धनहानीचा सामाना करावा लागू शकतो. तसेच, तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे वाद होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या चौथ्या चरणात शनी मार्गी होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी थोडं सावध राहण्याची गरज आहे. तसेच, जर तुम्ही या काळात नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी योग्य वेळ नाहीये. तसेच, पैशांची बचत करण्यासाठी तुम्ही असमर्थ असाल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडं सतर्क राहावं लागेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे. शनी या राशीच्या दुसऱ्या चरणात असल्यामुळे तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, बिझनेसच्या बाबतीत तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर मित्रांबरोबर तुमचे छोटे-मोठे वादविवाद होऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: