Shani : कुंभ राशीत शनि-मंगळाचा विनाशकारी योग; देशासह जगभरात माजणार खळबळ, 'या' मोठ्या घटनांनी जग हादरणार
Shani Magal Yuti : मंगळ 15 मार्चला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, यानंतर एप्रिलच्या अखेरीस शनि-मंगळाचा विशेष योग तयार होत आहे. या योगाचा वाईट परिणाम देशासह संपूर्ण जगावर पडेल. या काळात अनेकर राजकीय घोटाळे, आखाती देशांमध्ये युद्ध, वातावरणात लक्षणीय बदल, लैंगिक शोषणासारख्या अनेक घटना घडतील. शनीच्या प्रभावामुळे मेष राशींच्या व्यक्तींनाही त्रास होईल.
Shani Magal Yuti 2024 : भारतीय वेळेनुसार, 15 मार्चला संध्याकाळी 6 वाजता मंगळ मकर राशीतून बाहेर पडेल आणि कुंभ राशीत प्रवेश करेल. कुंभ राशीत शनि (Shani) आणि शुक्र आधीच उपस्थित आहे, त्यामुळे मंगळ आल्यावर या 3 ग्रहांचा संयोग होईल.
राजकीय उलथापालथ होणार?
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शुक्र हा कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करेल, परंतु मंगळ आणि शनीचा विनाशकारी योग एप्रिलच्या शेवटपर्यंत कुंभ राशीत राहील. मंगळ आणि शनि या क्रूर ग्रहांचा हा संयोग मार्चच्या मध्यात होत आहे, नेमकं त्याच वेळी रशियाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका आणि एप्रिलमध्ये भारताच्या लोकसभा निवडणुका होत आहेत, त्यामुळे या काळात हा योग मोठ्या राजकीय आणि आर्थिक उलथापालथीचे संकेत देतो.
महागाई आणि धार्मिक वाद वाढणार
मंगळ-शनि युतीमुळे महागाई आणि धार्मिक वाद वाढू शकतात. कुंभ राशीला धार्मिक स्थळांची राशी म्हणतात. मंगळ-शनीच्या युतीमुळे मोठ्या देशांमध्ये धार्मिक वाद आणि महिलांवरील हिंसाचाराच्या घटना वाढतील. पश्चिम बंगालमध्येही सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी आणि त्यापूर्वी काही हिंसक घटना घडू शकतात आणि अनावश्यक धार्मिक वाद उद्भवू शकतात. मंगळ-शनि युतीमुळे महागाई वाढेल, ज्यामुळे आखाती देशांमध्ये युद्धाचं वातावरण निर्माण होऊ शकतं.
एप्रिलमध्ये जाणवणार विक्रमी उष्णता
एप्रिल महिन्यात गुरू आणि बुध हे सौम्य ग्रह मेष राशीच्या अग्नी घरात प्रवेश करतील, जे कुंभ राशीत शनीच्या तृतीय घरात असतील. शनीच्या प्रभावामुळे मेष राशीला देखील त्रास होईल, त्यामुळे या वर्षी एप्रिलमध्ये उष्णता प्रचंड प्रमाणात वाढेल.
भारताच्या पश्चिम भागात, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्राचा काही भाग आणि आसाममध्ये यावर्षी एप्रिलमध्ये सामान्यपेक्षा जास्त उष्णता असेल. उत्तर भारतातही एप्रिल महिन्यात हवामानासोबतच राजकारणाचं तापमानही चढेच राहणार आहे.
निवडणुकांवेळी नेत्यांची जीभ घसरणार
भारतात सार्वत्रिक निवडणुकांवेळी अनेक घटना घडतील. मोठ्या नेत्यांची भाषा आणि राजकीय सभ्यता अत्यंत खालच्या पातळीवर घसरेल, ज्यामुळे तरुण वर्गाचा राजकारणाबद्दल भ्रमनिरास होऊ शकतो.
बड्या नेत्यांच्या आरोग्याला धोका
शनि-मंगळ युतीमुळे मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिलमध्ये हिंसक घटना घडण्याची शक्यता निर्माण होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रकृतीत झपाट्याने घट होईल. शनि-मंगळ युती भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी अशुभ ठरेल, निवडणूक प्रचारादरम्यान त्यांची प्रकृती बिघडू शकते.
शेअर बाजारात खळबळ
कुंभ राशीत शनि आणि मंगळाच्या युतीमुळे सुरुवातीला शेअर बाजार चढ्या स्वरुपात असेल, त्यानंतर 8 एप्रिलच्या ग्रहणानंतर शेअर बाजारात मोठी घसरण जाणवू शकते. काही मोठ्या राजकीय घोटाळ्यामुळे अर्थव्यवस्थेत काहीशी घसरण येऊ शकते.
भारत, अमेरिकेत लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढतील
कुंभ राशीमध्ये शनि-मंगळाच्या युतीचा प्रभाव मार्चच्या मध्यापासून एप्रिलच्या अखेरपर्यंत राहील, त्यामुळे भारत आणि अमेरिकेत अत्याचाराच्या घटना वाढतील. या काळात अशाच काही आणखी त्रासदायक घटना समोर येऊ शकतात.
रशियात घडणार मोठ्या घटना
शनि-मंगळाची ही युती रशियाचं राशी चिन्ह असलेल्या कुंभ राशीला त्रास देईल आणि यामुळे सध्या सुरू असलेल्या युक्रेन युद्धात मोठी हिंसक घटना घडण्याची शक्यता आहे. हे निवडणुकीतील हिंसाचार आणि मोठ्या राजकीय नेत्याच्या निषेधाचंही चिन्ह आहे. यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना त्यांचा वादग्रस्त विजय फार काळ साजरा करता येणार नाही.
परदेशात होणार पूर्ण सूर्यग्रहण
शनि आणि मंगळाच्या या संयोगादरम्यान, 8 एप्रिलला अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये एक मोठं पूर्ण सूर्यग्रहण दिसेल. शनि आणि मंगळ या शत्रू ग्रहांच्या संयोगाच्या वेळी एक मोठं पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. बऱ्याच काळानंतर ही स्थिती येणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Dev : 'या' 10 गोष्टींचं पालन करणाऱ्यांना शनि कधीच देत नाही त्रास; वेळ आल्यावर देतो भरघोस सुख