Shani Kendra Yog : कर्मफळदाता शनी आणि गुरुचा होतोय संगम; 15 जूनपासून 'या' राशींना लागणार लॉटरी, हातात खेळणार पैसाच पैसा
Shani Kendra Yog : ज्योतिषाचार्यांच्या म्हणण्यानुसार, 15 जून रोजी संध्याकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी शनी देव गुरु ग्रहासह एकमेकांच्या 90 डिग्री अंशावर असणार आहे.

Shani Kendra Yog : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनिदेवाला (Shani Dev) सर्वात शक्तिशाली ग्रह मानतात. नवग्रहांमध्ये शनी हा सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तसेच, नक्षत्र परिवर्तन करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळेच, शनीला एका नक्षत्रातून पुन्हा त्याच नक्षत्रात येण्यासाठी 27 वर्षांचा कालावधी लागतो.
सध्या ज्योतिषीय गणणेनुसार, शनी महाराज मीन राशीत विराजमान आहेत. जून 2027 पर्यंत शनी याच राशीत विराजमान असणार आहेत. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या ग्रहावर शनीची दृष्टी पडते. यामुळे अनेक दुर्लभ संयोग निर्माण होतात. शनीदेव पुन्हा शुभ योग जुळवून आणणार आहे. याचा प्रभाव मानवासह सर्व 12 राशींवर होणार आहे. मात्र, याचा सकारात्मक परिणाम कोणत्या राशींवर होणार ते जाणून घेऊयात.
ज्योतिषाचार्यांच्या म्हणण्यानुसार, 15 जून रोजी संध्याकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी शनी देव गुरु ग्रहासह एकमेकांच्या 90 डिग्री अंशावर असणार आहे. यामुळे केंद्र योग निर्माम होईल. या योगामुळे काही राशींना बंपर लाभ मिळणार आहे.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी शनी-गुरुचा केंद्र योग फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात चांगलं यश मिळेल. तसेच, नोकरीत देखील उत्तम कामगिरी कराल.तुमची रखडलेली कार्य पूर्ण होतील. तसेच, तुमच्या व्यवसायात चांगली वाढ झालेली दिसेल. शनीदेवाची कृपा तुमच्या पाठीशी असेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे. या राशीच्या लोकांची धार्मिक कार्यात रुची वाढेल. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तुमच्या आरोग्याच्या बाबतीत सर्व चिंता दूर होतील. तसेच, वैवाहिक जीवन फार सुरळीत चालेल. करिअरला योग्य दिशा मिळणार.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांना या काळात चांगलं यश मिळेल. भावा-बहिणीमध्ये चांगले संबंध निर्माण होतील. तसेच, शनिदेवाच्या कृपेने तुमची सगळी रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. मित्रांचा चांगला सपोर्ट मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















