Shani Gochar : नवीन वर्ष 2025 'या' 3 राशींसाठी ठरणार लकी; विविध स्त्रोतांमधून होणार प्रगती, मार्गातील अडथळे होतील दूर
Shani Gochar : ज्योतिष शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी त्याच्या जन्मानुसार दुसऱ्या, पाचव्या आणि नवव्या चरणात असेल तर अशा लोकांवर शनीचा चांगला प्रभाव पडतो.
Shani Gochar : ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) न्यायदेवता म्हटलं जातं. जर तुमच्यावर शनीची (Lord Shani) कृपा असेल तर तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळू शकते. शनीला सर्वात धिम्या गतीने चालणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीवर कधीना कधी शनीच्या वाईट प्रभावाचा सामना करावा लागतो. व्यक्तीच्या कर्मानुसार, शनीचा शुभ-अशुभ परिणाम मिळतो. नवीन वर्ष 2025 मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना याचा शुभ परिणाम मिळेल. या राशींची आर्थिक स्थिती चांगली राहील. तसेच, करिअरमध्ये देखील चांगली प्रगती पाहायला मिळेल. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी त्याच्या जन्मानुसार दुसऱ्या, पाचव्या आणि नवव्या चरणात असेल तर अशा लोकांवर शनीचा चांगला प्रभाव पडतो. त्याचप्रकारे, 2025 मध्ये मीन राशीत आल्यानंतर या 3 राशींना चांगला लाभ मिळणार आहे. हा प्रभाव 2027 पर्यंत असेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
शनीचं राशी परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबात चांगला वेळ जाईल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. बिझनेसमध्ये तुमची चांगली प्रगती होईल. तसेच, अनावश्यक खर्चांपासून तुम्ही दूर राहाल. जे अविवाहीत लोक आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. तसेच, या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमच्यावर कर्जाचा डोंगर राहणार नाही. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला अचानक लाभ होण्याची शक्यता आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनीची रास कुंभ रास आहे. या राशीच्या दुसऱ्या चरणात शनी स्थित असतात. त्यामुळे या राशीच्या लोकांना देखील शनीच्या संक्रमणाचा चांगला लाभ मिळणार आहे. या काळात तुम्ही ठरवलेली, नियोजित केलेली अनेक कामे पूर्ण होतील. तुमच्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी प्राप्त होतील. तसेच, तुम्हाला परदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :