Shani Gochar 2025 : शनीचं होणार नक्षत्र परिवर्तन, 'या' 3 राशींचं उजळणार भाग्य; नवीन नोकरीसह प्रगतीचे येणार शुभ योग
Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी तब्बल 27 वर्षांनंतर पूर्वाभाद्रपद नक्षत्रात परिवर्तन करणार आहे. शनीच्या राशी परिवर्तनाचा परिणाम 3 राशींवर होणार आहे.

Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी सर्व ग्रहांमध्ये सर्वात बलशाली ग्रह मानला जातो. शनी (Shani Dev) एका राशीत तब्बल अडीच वर्षांपर्यंत स्थित असतो. तसेच, शनीच्या (Lord Shani) राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व राशींवर अनेक काळापर्यंत असतो. शनी एका ठराविक कालावधीपर्यंत राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात. शनी सध्या पूर्व भाद्रपद नक्षत्रात विराजमान आहे. तर, 2 मार्च रोजी नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी तब्बल 27 वर्षांनंतर पूर्वाभाद्रपद नक्षत्रात परिवर्तन करणार आहे. शनीच्या राशी परिवर्तनाचा परिणाम 3 राशींवर होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
कर्क रास (Cancer Horoscope)
या राशीच्या लोकांसाठी शनीच्या पूर्वाभाद्रपदाच्या तिसऱ्या चरणात असल्यामुळे लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. नोकरीत तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, तुमच्या आयुष्यात आनंदाची सीमा उरणार नाही. तुमचं काम तुम्ही धैर्याने करणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या करिअरमध्ये चांगलं यश मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा काळ फार अनुकूल ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या वाणीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तसेच, नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळते. या काळात तुम्ही तुमच्या आरोग्यावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. या काळात विनाकारण खर्च करु नका. अन्यथा तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी शनीचं पूर्वाभाद्रपदाच्या तिसऱ्या चरणात असल्यामुळे हा काळ शुभ असू शकतो. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. नोकरी आणि व्यवसायात तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. या काळात तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. शैक्षणिक कार्यात तुमचं चांगलं मन रमेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















