Shani Gochar : 2024 वर्षाच्या शेवटी शनीची बदलणार चाल; 27 डिसेंबरपासून 'या' 5 राशींवर असणार शनीची नजर
Shani Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी 27 डिसेंबर 2024 रोजी रात्री 10 वाजून 42 मिनिटांनी शतभिषा नक्षत्रातून पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
Shani Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्ज्ञानुसार, शनी (Shani Dev) हा एक असा ग्रह आहे ज्याच्या संक्रमणाचा सर्व 12 राशींवर शुभ-अशुभ परिणाम होतो. शनीला (Lord Shani) दंडाधिकारी देखील म्हणतात. शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतात. त्यामुळेच जेव्हा शनीचं संक्रमण किंवा राशी परिवर्तन होतं तेव्हा सर्व राशींसाठी हा काळ फार महत्त्वाचा असतो. तर, येत्या 27 डिसेंबर रोजी शनी नक्षत्र परिवर्तन करणार आहे. या काळात कोणकोणत्या राशींवर (Zodiac Signs) याचा परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी 27 डिसेंबर 2024 रोजी रात्री 10 वाजून 42 मिनिटांनी शतभिषा नक्षत्रातून पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. याचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार ते पाहूयात.
मेष रास (Aries Horoscope)
शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष राशीच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा पाहायला मिळेल. या काळात तुमच्या व्यवसायात लाभ मिळण्याचे संकेत आहेत. तसेच, गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना या काळात प्रमोशन मिळू शकतं. तसेच, नवीन नोकरीचे प्रस्ताव तुमच्यासमोर येऊ शकतात. या काळात तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा.
तूळ रास (Libra Horoscope)
शतभिषा नक्षत्रातून निघून पूर्व भाद्रपद नक्षत्रात शनी प्रवेश करणार आहे. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत चांगले बदल होतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार अधिक वाढेल. नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीचे अनेक प्रस्ताव मिळतील. विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा मिळेल. तसेच, मित्रांबरोबरचा काळ चांगला जाईल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
शनीच्या संक्रमणाने धनु राशीच्या लोकांवर याचा चांगला परिणाम होणार आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत वाढ पाहायला मिळेल. तसेच, नशिबाची चांगली साथ मिळेल. तुम्हाला आर्थिक गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. वैयक्तिक आयुष्यात प्रगती पाहायला मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांना या काळात चांगला धनलाभ होईल. या काळात अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे काम पूर्ण होईल. तसेच, करिअरच्या बाबतीत तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. सामजिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. मित्रपरिवारा बरोबरचा काळ चांगला जाईल.
मीन रास (Pisces Horoscope)
शनीच्या कृपेने मीन राशीक्च्या आर्थिक उत्पन्नात चांगली वाढ होईल. नोकरदार वर्गातील लोकांची कामाच्या ठिकाणी स्तुती होईल. या काळात तुमचं प्रमोशन होण्याची देखील शक्यता आहे. लाईफ पार्टनरबरोबरचा काळ चांगला जाईल. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: