Shani Dev : शनीच्या वक्री चालीने सुरु होणार नवीन आठवडा; 'या' 4 राशींना मिळणार अपार धन, सुख-समृद्धीत होईल भरभराट
Shani Dev : या काळात चंद्र मंगळच्या राशीत मजबूत असणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे.
Shani Dev : जुलै महिन्याचा पहिला आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. याचं कारण म्हणजे शनी (Shani Dev) कुंभ राशीतच वक्री होणार आहे. या काळात चंद्र मंगळच्या राशीत मजबूत असणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे. तसेच, आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात शनी (Lord Shani) कर्क राशीत पोहोचणार आहेत. त्यामुळे हा आठवडा कोणत्या 5 राशींसाठी शुभकारक असणार आहे ते जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभकारक असणार आहे. या काळात सहकाऱ्यांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. सामाजिक कार्यात तुमची प्रगती दिसून येणार आहे. व्यापार वर्गातील लोकांना या काळात चांगला लाभ मिळणार आहे. वैवाहिक जीवनातील तुमचे संबंध चांगले असतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या अनेक जबाबदारीची कामे सोपवली जातील. ती तुम्ही जबाबदारीनं पार पाडणं गरजेचं आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक असणार आहे. सहकाऱ्यांबरोबर तुमचा व्यवहार चांगला असणार आहे. नियमित व्यायाम केल्याने तुमचे शरीर मजबूत असेल. तसेच, कोणाबरोबर जर तुमचे मतभेद असतील तर ते या काळात दूर होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे या काळात पूर्ण होतील. त्यामुळे तुमचा उत्साह वाढलेला दिसेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. ऑफिसच्या कामात तुमची चांगली प्रगती दिसून येणार आहे. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच या काळात तुम्हाला समाजात चांगली मान्यता मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला छोट्या-छोट्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील.
तरूणांना अनेक दिवसांपासून ज्या नोकरीची संधी हवी होती ती तुम्हाला मिळेल. अनेकांशी व्यवहार करताना सावधानता बाळगण्याची गरज आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :