Shani Dev : वृश्चिक राशीतून ढैय्याचा प्रभाव हटताच 'या' राशींचं नशीब उजळणार; अनेक स्त्रोतातून होणार धन-संपत्तीचा वर्षाव
Shani Dev : शनीचं संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार नाही. तसेच, इतर राशींच्या लोकांवर देखील याचा प्रभाव पडणार आहे.
Shani Dev : वृश्चिक राशीच्या लोकांवर सध्या शनीच्या (Shani Dev) ढैय्याचा प्रभाव आहे. हा प्रभाव मागच्या अडीच वर्षांपासून सुरु आहे. शनी (Lord Shani) सध्या चौथ्या चरणात संक्रमण करणार आहे. या स्थानी तुमच्यावर आनंदाचा वर्षाव होणार आहे. मात्र, शनी आणि मंगळच्या मध्ये शत्रू भाव आहे त्यामुळे शनीचं संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार नाही. तसेच, इतर राशींच्या (Zodiac Signs) लोकांवर देखील याचा प्रभाव पडणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृश्चिक रास (Taurus Horoscope)
वृश्चिक राशीत 2025 पर्यंत शनीच्या ढैय्याचा प्रभाव असणार आहे. मात्र, 29 मार्च 2025 नंतर या ढैय्यापासून मुक्ती मिळणार आहे. सध्या तुमच्या जीवनात सकारात्मक बदल पाहायला मिळतील विशेषत: तुमच्या आर्थिक स्थितीत चांगले बदल पाहायला मिळतील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ रास ही शनीच्या प्रिय राशींपैकी एक आहे. जेव्हा पण शनीची दृष्टी आपल्या राशीत किंवा उच्च राशीवर पडते त्याचा सर्वात शुभ परिणाम तूळ राशीच्या लोकांना होतो. या वेळेस शनीच्या मार्गी होण्याचा लाभ तूळ राशीच्या लोकांना सर्वात जास्त मिळणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांचं कामात मन रमेल. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल.
मकर रास (Capricorn Horoscope)
तूळ राशीव्यतिरिक्त मकर रास ही शनीची प्रिय रास आहे. या राशीच्या लोकांवर सर्वात जास्त शनीची कृपा असते. या वेळेस सुद्धा शनीच्या सरळ चालीने मकर राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. तरुणांना कामानिमित्त परदेशी जाण्याची संधी मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनीला कुंभ राशीचा स्वामीग्रह म्हणतात. या राशीवर शनी नेहमी प्रसन्न असतात. शनीचं मार्गी होणंसुद्धा या राशीच्या लोकांसाठी प्रचंड लाभदायक ठरणार आहे. तरुणांची करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. तसेच, तुमच्या समोर उत्पन्नाच्या अनेक नवीन संधी निर्माण होतील. तुमचे आरोग्य सुधारेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ