(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Dev : अवघ्या काही तासांतच शनी बदलणार चाल! 'या' 4 राशी होतील मालामाल तर 5 राशींचं वाढणार टेन्शन
Shani Dev : शनीच्या अशुभ प्रभावाने ज्याप्रकारे व्यक्तीला आयुष्यात अनेक परिणामांचा सामना करावा लागतो तेच शुभ परिणामांनी आयुष्य सुखमय करता येते.
Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रात, कर्मफळदाता शनी (Shani Dev) 18 ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्या पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनीने (Lord Shani) नक्षत्र परिवर्तन करताच काही राशीच्या लोकांना शुभ तर काही राशीच्या लोकांना अशुभ परिणाम मिळणार आहे. ज्योतिष शास्त्रात शनीला विशेष स्थान देण्यात आलं आहे. शनीला पापी ग्रह देखील म्हटलं जातं. शनीच्या अशुभ प्रभावाने प्रत्येकाला भीती वाटते.
शनीच्या अशुभ प्रभावाने ज्याप्रकारे व्यक्तीला आयुष्यात अनेक परिणामांचा सामना करावा लागतो तेच शुभ परिणामांनी आयुष्य सुखमय करता येते. सध्या शनी शतभिषा नक्षत्रात विराजमान आहे. शनीच्या साडेसाती आणि ढैय्याचा या नक्षत्र परिवर्तनावर सर्वाधिक परिणाम होतो.
मेष रास (Aries Horoscope)
या दरम्यान मेष राशीच्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुमच्या नोकरीत जर काही तणाव असेल तर तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुम्ही पैसे कमी खर्च करुन पैशांची बचत करायला शिका. कुटुंबात छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. तुमचं वजन वाढल्या कारणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो.
वृषभ रास (Taurus Horoscope)
या काळात कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक नवीन संधी मिळतील. त्यामुळे तुमचं प्रोफाईल आणखी मजबूत होईल. व्यवसायातील लोकांसाठी हा काळ फार आव्हानात्मक असेल. प्रतिस्पर्धी लोकांशी सतत तुलना करु नका. भावा-बहिणीच्या नात्यात संभाषण ठेवा.
मिथुन रास (Gemini Horoscope)
तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये फार मेहनत घेण्याची गरज आहे. तरच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. प्रामाणिकपणे काम करत राहिलात तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
या काळात नोकरीशी संबंधित तुम्हाला अनेक नवीन संधी मिळतील. रोजगाराचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. विद्यार्थ्यांना या काळात खूप मेहनत घ्यावी लागेल. तसेच, कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील.
सिंह रास (Leo Horoscope)
जर तुमचे कोर्ट कचेरीच्या संदर्भात काही वाद सुरु असतील तर ते लवकरच संपुष्टात येतील. तुमच्या लव्ह लाईफमध्ये काही अडचणी येऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. वातावरणाती बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
मकर रास (Capricorn Horoscope)
या राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होतील. व्यवसायाशी संबंधित तुमचा व्यवसाय अधिक विस्तारण्याची शक्यता आहे. तसेच, नवीन योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करु शकता.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळेल. तुमचा व्यवसाय अधिक विस्तारण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत छोट्या-मोठ्या तक्रारी जाणवतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :